Advertisement

कुर्ल्यात सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळून महिला गंभीर जखमी

कुर्ला परिसरात नाद हॉटेलजवळ सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सार्वजनिक शौचालयाची भिंत अचानक कोसळली.

कुर्ल्यात सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळून महिला गंभीर जखमी
SHARES

सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळून एक महिला गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना कुर्ला परिसरात घडली. जखमी महिलेला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

कुर्ला परिसरात नाद हॉटेलजवळ सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सार्वजनिक शौचालयाची भिंत अचानक कोसळली. भिंतीच्या ढिगाराखाली एक महिला अडकली होती. स्थानिकांनी तातडीने घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगार बाजूला करून महिलेला बाहेर काढले. महिला गंभीर जखमी झाली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


हेही वाचा -

यंदा महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण, अनुयायांना मज्जाव

महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी 'फेस रिडर' यंत्रणाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement