Advertisement

मेट्रो २ बी विरोधात रहिवासी रस्त्यावर! मानवी साखळीद्वारे नोंदवला निषेध

शुक्रवारी या परिसरातील स्थानिकांनी जेव्हीपीडी ते वांद्रे (प) अशी ७ किमीची मानवी साखळी उभारून सरकारचा निषेध नोंदवला. या आंदोलनात अभिनेत्री रविना टंडन आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर देखील सहभागी झाल्याची माहिती नितीन किलावला यांनी दिली.

मेट्रो २ बी विरोधात रहिवासी रस्त्यावर! मानवी साखळीद्वारे नोंदवला निषेध
SHARES

मेट्रो २ बी मार्ग पूर्णतः भुयारी करावा अशी जेव्हीपीडी, खार आणि वांद्रे पश्चिमेकडील रहिवाशांची मागणी आहे. मात्र या मागणीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाला मोकळी वाट करून देण्यासाठी शुक्रवारी या परिसरातील स्थानिकांनी जेव्हीपीडी ते वांद्रे (प) अशी ७ किमीची मानवी साखळी उभारून सरकारचा निषेध नोंदवला. या आंदोलनात अभिनेत्री रविना टंडन आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर देखील सहभागी झाल्याची माहिती नितीन किलावला यांनी दिली.




विरोधाचं कारण काय?

डी. एन. नगर ते मानखुर्द मार्ग जेव्हीपीडी ते वांद्रे पश्चिम दरम्यान ज्या रस्त्यावरून मेट्रो २ बी जाणार आहे ते रस्ते अरुंद आहेत. या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी असते. त्यावर मेट्रोचे खांब उभे केल्यास रस्ते आणखी अरुंद होतील आणि वाहतूककोंडी वाढेल, असं म्हणत रहिवासी मेट्रो-३ ला विरोध करत आहेत. मेट्रो २ बी भुयारी करावी अशी रहिवाशांची मागणी आहे. 'एमएमआरडीए'नं मात्र भुयारी मेट्रो खर्चिक असून भुयारी मेट्रोच्या कामासाठी वेळ अधिक लागत असल्याचं तसंच आता मेट्रो-२ बी चं काम बऱ्यापैकी पुढं गेल्याचं म्हणत ही मागणी फेटाळून लावली आहे.




न्यायालयात याचिका

ही मागणी मान्य होत नसल्यानं रहिवाशांच्या संघटनांसह नानावटी रूग्णालयाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मेट्रो २ बी च्या कामाला न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळं 'एमएमआरडीए'ची अडचण वाढली असून ही स्थगिती उठवण्यासाठी 'एमएमआरडीए' न्यायालयात पाठपुरावा करत आहे. मात्र त्यात यश येताना दिसत नाही.




रस्त्यावर लढाई

एकीकडे रहिवाशांची न्यायालयीन लढाई सुरू आहे, तर दुसरीकडे रस्त्यावरचीही लढाई लढत आहेत. तर आता ही रस्त्यावरची लढाई तीव्र करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे. नागरिकांमध्ये या प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी रहिवाशी संघटनांनी रस्त्यावरचं आंदोलन तीव्र केलं आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी दुपारी १ वाजता जेव्हीपीडी ते वांद्रे पश्चिम दरम्यान मानवी साखळी तयार करत रहिवाशांनी आपला विरोध नोंदवला. यात शाळकरी मुलांपासून सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला.



हेही वाचा-

पंतप्रधानांच्या बुलेट ट्रेनच्या स्वप्नांना गुजरातमधूनच सुरूंग! १००० शेतकऱ्यांचा एल्गार

मेट्रो-२ बी विरोध: संतापलेले स्थानिक करणार 'नोटा'चा वापर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा