Advertisement

मुंबई पोर्ट ट्रस्टकडून नाविकांसाठी बंदरात 'सीफेरर सेंटर'

प्रवासी नाविकांच्या सोयीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून बंदर परिसरात सीफेरर सेंटरची निर्मिती केली जाणार आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टकडून नाविकांसाठी बंदरात 'सीफेरर सेंटर'
SHARES

प्रवासी नाविकांच्या सोयीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून बंदर परिसरात सीफेरर सेंटरची निर्मिती केली जाणार आहे. देश-विदेशातील नाविकांना याठिकाणी विरंगुळ्याबरोबरच अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. या कामासाठी ट्रस्टने इच्छुक कंपनीकडून अर्ज मागविले आहेत. सार्वजनिक खासगी भागीदारीतून हे सेंटर उभारले जाणार आहे.

परदेशातील बहुतांश मोठ्या बंदरात नाविकांना काही काळ थांबता अथवा विश्रांती करता यावी, याकरिता सीफेरर भवन उभारलेले असते. मुंबई पोर्ट हे ब्रिटीशकालीन बंदर आहे. मात्र, याठिकाणी नाविकांकरिता हक्काचे असे ठिकाण नव्हते. सीफेरर सेंटर उभारले जात असल्याने आता त्यांना विरंगुळ्यासाठी बंदरात येता येणार आहे.

या सेंटरमध्ये रेस्तराँ, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकान, व्यायामशाळा, बिलार्ड टेबल, स्पा आणि सलून, कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी इंटरनेट आणि दूरध्वनी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच सेंटरमध्ये छोटेखानी वाचनालय आणि टेलिव्हिजन सेटची सुविधा असेल. यामुळे नाविकांना निवांत वेळ घालविता येईल.



हेही वाचा -

मुंबईत गुरुवारी कोरोनाचे नवीन ५४० रुग्ण

मुंबईत पावसाची हजेरी; मुंबईकरांना दिलासा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा