Advertisement

आणखी एक नशीबवान... ६ कोटींची दोन्ही घरं पडली पदरात

पाच कोटी १३ लाख आणि पाच कोटी ८० लाख अशा दोन अलिशान, महागड्या घरासाठी विजेते ठरलेले विनोद शिर्के हे शिवसेनेच्या आग्रीपाडा विभागाचे शाखा प्रमुख आहेत. शिर्के यांना ३६७ आणि ३६८ या संकेत क्रमांकातील दोन घरं लागली अाहेत.

आणखी एक नशीबवान... ६ कोटींची दोन्ही घरं पडली पदरात
SHARES

रविवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १३८४ घरांसाठी लाॅटरी फुटणार म्हणताच सर्वाचंच विशेष लक्ष होत ते ग्रँट रोड येथील ५ ते ६ कोटी रुपयांच्या ३ घरांकडे. ही कोट्यवधींच्या आणि अलिशान घरांसाठी भाग्यवान विजेता कोण असेल याचीच चर्चा लाॅटरीत सर्वाधिक होती.

विनोद शिर्केंना २ घरं

ग्रँट रोड येथील संकेत क्रमांक ३६६ मधील ४ कोटी ९९ लाखांच्या घरासाठी अख्तर मोहम्मद हे विजेते ठरले. तर ३६७ संकेत क्रमांकामधील ५ कोटी १३ लाख रूपयांच्या घरासाठी विनोद शिर्के हे विजेते ठरले. त्यानंतर संकेत क्रमांक ३६८ मधील सर्वात महाग अशा ५ कोटी ८० लाखाच्या घरासाठी काऊंट डाऊन सुरू झालं नि स्क्रिनवर नाव झळकलं ते विनोद शिर्के यांचं. पुन्हा दुसऱ्या घरासाठी विनोद शिर्के हेच विजेते ठरले. त्यानंतर लाॅटरी संपेपर्यंत सहा कोटींच्या घरासह विनोद शिर्के यांना लागलेल्या दोन घरांचीच चर्चा होती.


१३६ अर्ज

मुंबई मंडळाची रविवारची लाॅटरी खऱ्या अर्थानं चर्चेची आणि उत्साहाची ठरली. कारण कधी नव्हे ते एकाच कुटुंबातील तीन जणांना घर लागलं. तर दुसरीकडे एकाच व्यक्तीला पाच कोटी आणि पावणे सहा कोटीचं घर लागलं.  ग्रँट रोडमधील तीन घरांसाठी १३६ अर्ज आलेले असताना त्यातील तीन विजेत्यांमध्ये दोन नाव ही एकाच व्यक्तीची होती. 


शिवसेनेचे शाखाप्रमुख

 पाच कोटी १३ लाख आणि पाच कोटी ८० लाख अशा दोन अलिशान, महागड्या घरासाठी विजेते ठरलेले विनोद शिर्के हे शिवसेनेच्या आग्रीपाडा विभागाचे शाखा प्रमुख आहेत. शिर्के यांना ३६७ आणि ३६८ या संकेत क्रमांकातील दोन घरं लागली असून आता त्यांना एक घर सरेंडर करावं लागणार आहे. शिर्के जे घर सरेंडर करतील ते घर या संकेत क्रमांकातील पहिल्या क्रमांकांच्या प्रतिक्षा यादीवरील विजेत्याला प्राधान्यक्रमानं दिलं जाईल.


मी १९९९ पासून दरवर्षी म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरत अाहे. मात्र, १८ वर्ष नशिबाने मला हुलकावणी दिली. यंदाच्या लाॅटरीत माटुंगा, घाटकोपर, ग्रँट रोड अाणि अन्य ठिकाणी असे ८ अर्ज मी भरले होते.  कधी एकही घर लागलं नव्हतं. पण अाता दोन घरे लागली अाहेत. त्यामुळे खूप अानंद होत अाहे. दोनपैकी एक घर परत करावं लागणार अाहे. कुटुंबाशी चर्चा करून कोणतं घर परत करायचं याचा निर्णय घेणार अाहे. 

- विनोद शिर्के, विजेताहेही वाचा - 

नशीब असावं तर असं... एकाच घरातील तीन जणांना लाॅटरी

म्हाडा लाॅटरी : अनिता तांबे पहिल्या भाग्यवान विजेत्या
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा