Advertisement

सोमवारपासून रंगणार ज्युनिअर कबड्डी लीग


सोमवारपासून रंगणार ज्युनिअर कबड्डी लीग
SHARES

यू मुम्बा संघातील आघाडीचे कबड्डीपटू काशिलींग अडके आणि नितीन मदने या दोघांनी मुंबईच्या शाळेतील मुलांना कबड्डीबद्दलचे महत्त्व पटवून देत मुंबईत होणाऱ्या कबड्डी ज्युनिअर्स लीगमध्ये भाग घेण्यास प्रेरित केले आहे.


ज्यानंतर जॉन कॉनन स्कूल, जी. डी. सोमानी मेमोरिअल स्कूल, अदित्य बिर्ला वर्ल्ड अॅकॅडेमी, धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, कॅम्पियन स्कूल, जमनाबाई नर्सी स्कूल, सेंट पीटर्स स्कूल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल या शाळेतील मुलांनी कबड्डी ज्युनिअर लीगमध्ये सहभाग घेतला आहे.



कबड्डी ज्युनिअर स्पर्धा ही कबड्डी खेळाच्या जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आली आहे. 11 ते 12 वयोगटातील मुलांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. भारतातील मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद, अहमदाबाद, लखनौ, कोलकाता, हरियाणा, रांची, दिल्ली, जयपूर आणि चेन्नई अशा 12 बड्या शहरांत ही स्पर्धा आयोजित केली आहे. सोमवारी 27 ऑगस्टला पहिली लढत ही वरळी येथील एनएससीआय स्टेडियम येथे संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.



हेही वाचा - 

मुंबईच्या महिला-पुरुष संघाची पुणे कबड्डी स्पर्धेत आगेकूच

'स्पेशल' खेळाडूंसाठी फिटनेस ट्रेनिंग


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा