• कारगिल विजयात मोलाचा वाट असणारे '१२ यौद्धा'
  • कारगिल विजयात मोलाचा वाट असणारे '१२ यौद्धा'
  • कारगिल विजयात मोलाचा वाट असणारे '१२ यौद्धा'
  • कारगिल विजयात मोलाचा वाट असणारे '१२ यौद्धा'
  • कारगिल विजयात मोलाचा वाट असणारे '१२ यौद्धा'
  • कारगिल विजयात मोलाचा वाट असणारे '१२ यौद्धा'
  • कारगिल विजयात मोलाचा वाट असणारे '१२ यौद्धा'
  • कारगिल विजयात मोलाचा वाट असणारे '१२ यौद्धा'
  • कारगिल विजयात मोलाचा वाट असणारे '१२ यौद्धा'
  • कारगिल विजयात मोलाचा वाट असणारे '१२ यौद्धा'
SHARE

26 जुलै १९९९ हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस. याच दिवशी भारतीय सैन्यानं कारगिलमध्ये विजय मिळवला होता. घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याचा खात्मा करत कारगिल युद्ध जिंकलं होतं. या 'ऑपरेशन विजय'मध्ये देशानं ५०० पेक्षा अधिक वीर योद्धे गमावले. तर १४०० पेक्षा जास्त जवान जखमी झाले. पण या विजयाचे शिल्पकार ठरले हे १२ भारतीय सैनिक.


रायफल मॅन संजय कुमारजम्मू आणि काश्मीरच्या १३व्या बटालियनमध्ये ते कार्यरत होते. ते स्काऊट गटाचे होते. पाकिस्तानी सैन्याशी लढताना त्यांना गोळी देखील लागली होती. पण गोळी लागूनही ते लढत होते. त्यांच्या बलिदानासाठी सरकारनं त्यांचा परमवीर चक्र देऊन गौरव केला.


ग्रेनेडिअर योगेंद्र सिंह यादव


कमांडोंच्या प्लाटूनचे नेतृत्व करणाऱ्या यादव यांनी एक रणनिती आखून शत्रूवर हल्ला केला होता. ४ जुलै रोजी ते शहीद झाले. त्यांना सर्वोच्च परमवीर चक्रानं सन्मानीत करण्यात आलं.


कॅप्टन विक्रम बत्रा


कॅप्टन विक्रम बत्रा यांनी कारगिलच्या ४८७५ फूटावर भारताचा झेंडा फडकवला होता. विजयानंतर याच ठिकाणी ते धारातीर्थी पडले. जम्मू आणि काश्मीर बटालियनच्या १३ व्या तुकडीत ते कार्यरत होते. तोलोलिंग इथं पाकिस्तानी सैन्याने बनवलेल्या बंकर्सवर त्यांनी कब्जा केला होता. याच जागेला आज बत्रा टॉप म्हणून ओळखले जाते. या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.


कॅप्टन अनुज नय्यर


जाट रेजिमेंटच्या १७ व्या बटालियनमध्ये हे कार्यरत होते. ७ जुलैला ते टायगर हिलवर शत्रूशी दोन हात करताना शहीद झाले. सरकारनं त्यांच्या वीरतेला सलाम करत त्यांना मरणोत्तर महावीर चक्र किताबानं सन्मानित केलं आहे.


कॅप्टन एन. केंगुर्सू


राजपुताना रायफल्सच्या दुसऱ्या बटालियनमध्ये ते तैनात होते. कॅप्टन एन.केंगुर्सू कारगिल युद्धात लोन हिल्सवर २८ जूनला शहीद झाले. महावीर चक्र देऊन सरकारनं त्यांचा गौरव केला आहे.


लेफ्टनंट शींग क्लिफोर्ड नोगुर्म

जम्मू काश्मीरच्या लाइट इन्फट्रीच्या १२ व्या बटालिअनमध्ये ते होते. कारगिल युद्धात पॉईंट ४८१२ ला शत्रूच्या तावडीतून सोडवताना १ जुलै रोजी त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांनाही महावीर चक्रानं सन्मानीत करण्यात आलं.


मेजर पद्मपानी आचार्य

भारतीय सैन्यात हे राजपुताना राईफल्सच्या दुसऱ्या बटालियनमध्ये ते कार्यरत होते. २८ जून १९९९ साली लोन हिल्सवर पाकिस्तानी सैन्याशी लढताना त्यांना शहीद झालेसरकारनं त्यांना मरणोत्तर महावीर चक्र देऊन त्यांचा सन्मान केला.


कर्नल सोनम वांगचुक

लडाख स्काऊट रेजिमेंटमध्ये कर्नल सोनम वांगचुक अधिकारी होते. कारगिल युद्धातयान पाकिस्तानी सेनेशी लढताना कॉरवट लॉ टॉपवर ते शहीद झाले. त्यांना मरणोत्तर महावीर चक्र देऊन सन्मानीत करण्यात आले.


मेजर विवेक गुप्ता

मेजर विवेक गुप्ता राजपुताना राइफल्सच्या दुसऱ्या बटालियनमध्ये होते. १२ जून १९९९ मध्ये द्रास सेक्टरमध्ये एका महत्त्वाच्या ठाण्यावर कब्जा करण्यासाठी जात असाताना त्यांना वीरमरण आले. सरकारनं त्यांचा महावीर चक्र देऊन सन्मान केला.


कॅप्टन मनोजकुमार पांडे

गोरखा रायफल्सच्या पहिल्या बटालियनमध्ये ते कार्यरत होते. बटालिन सेक्टरमध्ये ११ जून रोजी त्यांनी शत्रूला पळता भूई करून सोडलं होतं. त्यांच्याच नेतृत्वाखाली सैन्यानं जॉबर टॉप आणि खालबुर टॉप या भागावर पुन्हा कब्जा मिळवला. त्यां त्यांना सैन्याचा परमवीर चक्रानं त्यांना सन्मानीत केलं.


मेजर राजेश सिंह

कारगिल युद्धात ३० मे १९९९ ला ते शहीद झाले. त्यांच्या वीरतेसाठी त्यांना महावीर चक्र देऊन सन्मानीत करण्यात आलं.


नायक दिगेंद्र

राजपुताना रायफलमध्ये ते कार्यरत होते. १५ ऑगस्ट १९९९ ला त्यांना महावीर चक्रनं सन्मानीत केलं.हेही वाचा

कारगिल युद्धाच्या विजयाची गाथा!कारगिल युद्धाच्या विजयाची गाथा!


संबंधित विषय
ताज्या बातम्या