अल्झायमर या आजारात (disease) मेंदू संकुचित होऊन मेंदूच्या पेशी मरायला लागतात. यामुळे स्मरणशक्ती कमी होते आणि दैनंदिन कामे करण्याची ईच्छा आणि क्षमता कमी होते.
माणसाची योग्यरित्या कार्य करण्याच्या क्षमतेवरही फरक पडतो. अल्झायमर आजाराचे निदान झाल्यास त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. यासाठी दरवर्षी जागतिक अल्झायमर दिन (World Alzheimer's Day) हा या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
अल्झायमर रोगावर भाष्य करताना डॉ. ज्ञानेश्वर जाधव, ऍपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, बोरिवलीचे (mumbai) न्यूरोलॉजिस्ट म्हणतात, “भारतात, स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तींपैकी फक्त 10 ते 12% लोकांना निश्चित आजाराचे निदान होते.
विशेषत: ग्रामीण भागामध्ये (ज्या लोकसंख्येमध्ये या आजाराचा मोठा वाटा आहे) अल्झायमरचे जास्त रुग्ण आढळतात. या आजाराची लक्षणे प्रथमत: दिसून येत नाही अथवा पटकन लक्षात येत नाही.
परंतु हा आजार जसजसा पुढे वाढत जातो तशी त्याची लक्षणे दिसू लागतात. कालांतराने, गिळणे आणि चालणे यासारखी साधी शारीरिक कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या न्यूरोनल पेशींवर याचा परिणाम होतो. ज्यामुळे रुग्ण अंथरुणाला खिळून राहतो.
सरकारने जनतेला अल्झायमर रोगाबद्दल प्रिंट, नेटवर्किंग किंवा मीडियाद्वारे शिक्षित करण्याची नितांत गरज आहे. यामुळे रोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळेल.
अल्झायमरचे लवकर निदान केल्याने लवकर उपचार सुरू करणे शक्य होते. ज्यामुळे हा आजार रोखला जाऊ शकतो." डॉ. ज्ञानेश्वर जाधव, एपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे न्यूरोलॉजिस्ट पुढे म्हणाले, सध्या भारतात (india) अल्झायमर रोगाची 8.8 दशलक्ष सक्रिय प्रकरणे आहेत. 2036 पर्यंत 16.9 ते 17 दशलक्ष ज्येष्ठांना बाधित होण्याची शक्यता आहे. 2050 पर्यंत हा आकडा तिप्पट होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा