Advertisement

'या' ५ रेस्टो आणि पबमध्ये लुटा फिफा वर्ल्डकपच्या फायनलचा आनंद!


'या' ५ रेस्टो आणि पबमध्ये लुटा फिफा वर्ल्डकपच्या फायनलचा आनंद!
SHARES

सध्या फिफा वर्ल्डकपनं भल्याभल्यांना वेड लावलं आहे. पण फुटबॉलचं हे वेड आता फक्त घरात बसून टीव्हीवर मॅच बघण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यांनी आपल्या पुऱ्या लाइफस्टाइलचा ताबा घेतलाय. रेस्टॉरंट आणि पब अशा ठिकाणी हल्ली फुटबॉल मॅचेस मोठ्या स्क्रिनवर दाखवल्या जातात. त्यामुळे तुमचं खाणं-पिणं आणि मॅच असं सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी अनुभवता येईल


रविवारी फिफा वर्ल्डकपची फायनल मॅच रंगणार आहे. फ्रान्स आणि क्रोएशिया या दोन संघामध्ये रविवारी फायनलचा थरार रंगणार अाहे. या दोन संघांपैकी कोणती टीम विश्वचषक उंचावणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. पण घरात बसून टीव्हीच्या छोट्या स्क्रिनवर मॅच पाहण्यापेक्षा एखाद्या मोठ्या स्क्रिनवर मॅच बघण्याची मजाच वेगळी. मग आम्ही तुम्हाला अशाच काही रेस्टॉरंटची नावं देणार आहोत, जिथे तुम्ही मॅचचा मनमुराद आनंद लुटू शकता.


) १२ युनियन पार्कखार

फिफा वर्ल्डकपची अंतिम मॅच पाहण्यासाठी तुम्ही '१२ युनियन पार्क' या ठिकाणी देखील जाऊ शकता. इथं तुम्ही मोठ्या स्क्रिनवर मॅच पाहण्याचा आनंद घेऊ शकता. फिफा मॅचसाठी त्यांनी ड्रिंक्सवर ऑफरदेखील दिली आहे. यूज मी, मॉर्निंग स्टार, मेमरी लॉस हे त्यांचे सिग्निचर कॉकटेल्स एकावर एक फ्री ऑफरमध्ये सर्व्ह केले जातील


कुठे : १२, युनियन पार्क, खार, मुंबई

संपर्क : ९१९६६४४४४७९४


) रास्ताखार

खार इथल्या 'रास्ता' पबमध्ये देखील तुम्ही मॅचची मजा लुटू शकता. यासाठी तुम्हाला १००० रुपये कव्हर चार्ज करावे लागतील.१००० पैकी ३०० रुपये एन्ट्री फी चार्जेस आहेत. तर बाकी ७०० रुपयांमध्ये तुम्ही ड्रिंक्स किंवा त्याची एखादी डिश ट्राय करू शकता. तुम्ही मॅच सुरू होण्याच्या आधी म्हणजे ७ वाजेपर्यंत पोहोचलात तर तिथं परफॉर्म होणाऱ्या गाण्यांवर थिरकू शकता. नॉईजी बॉय आणि के-टाऊन किड हे दोन डीजे ग्रूप्स तिकडे परफॉर्म करणार आहेत.

कुठे : रोहन प्लाझा, /५ फ्लोर, राम राम कृष्णा नगर, खार, मुंबई

संपर्क : ९१८६५५०००८११


) हॉपीपोलालोअर परेल

फिफा वर्ल्डकप निमित्त 'हॉपीपोला'मध्ये अनेक ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. फक्त ९९० मध्ये तुम्हाला जवळपास ११ ड्रिंक्स मिळणार आहेत. कॅप्टन मॉर्गनकेटल वन आणि गॉर्डन्स या ड्रिंक्सचा त्यात समावेश आहे. याशिवाय फक्त २५० रुपयांमध्ये वर्ल्डकप स्पेशल शॉट्स तुम्ही ट्राय करू शकता. 'मेस्सी अफेअर विथ वोडका', 'ब्ल्यू क्युरकाव अॅण्ड आईस्क्रिम', 'मॅन्गो ज्यू', 'स्ट्रॉबेरी कँडी अॅण्ड कोला सिरप' असी असे हटके ड्रिंक्स ट्राय करा.

कुठे : पहिला मजला, टोडी बिल्डिंग, मथुरादास मिली कम्पाऊंड, कमला मिल्सच्या समोर, लोअर परेल, मुंबई

मुंबई : २२३२०३८६५३


) लंडन टॅक्सीलोअर परेल

'लंडन टॅक्सी' फिफा वर्ल्डकपसाठी खूप उत्साही आहे. फिफा वर्ल्डकप थिमवर आधारित डेकोरेशन त्यांनी केलं आहे. मॅच बघण्यासाठी त्यांच्याकडे मोठी एलईडी स्क्रिन आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये बसून मॅच पाहत असल्याचा अनुभव तुम्हाला येईल. त्यांनी रेड कार्ड पॅकेजची ऑफर दिली आहे. यामध्ये ३ कोर्स मिल आणि बकेट ऑफ बिअर्सची ऑफर दिली  आहे

कुठे : ए विंग, तळ मजला, ट्रेड सेंटर, कमला मिल्स, लोअर परेल, मुंबई

संपर्क : ९०२९९९०४५४


) कोपाजुहू

फिफा वर्ल्डकपसाठी 'कोपा' या रेस्टॉरंटमध्ये ड्रिंक्सवर चांगल्या ऑफर्स दिल्या आहेत. याशिवाय तिथला स्पेशल पदार्थ आचारी टिक्का तुम्ही ट्राय कराअाचारी टिका ही इथल्या शेफची स्पेशॅलिटी आहे. अजून कुठल्या ऑफर्स आहेत, याची माहिती तुम्हाला तिकडे गेल्यावर अधिक कळेल. या, बघा आणि तुमच्या आवडत्या टिमला सपोर्ट करा.


कुठे : एना बिल्डींग,जुहू जिमखानाच्या विरुद्ध,जुहू,मुंबई 

संपर्क : ९८२०४३६६६६हेही वाचा

'फ्रोझन बॉटल'तर्फे आईस्क्रिमची ट्रिट फक्त ३९ रुपयांतसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा