Advertisement

स्वादिष्ट खाद्यपदार्थ स्पर्धा


स्वादिष्ट खाद्यपदार्थ स्पर्धा
SHARES

लोअर परेल - अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या वतीने पहिल्यांदाच खाद्यपदार्थ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परळमधील भगिनी समाज सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 20 महिलांनी सहभाग घेतला होता. महिलांनी राजगिरा आणि रताळे यांपासून तिखट आणि गोड खाद्यपदार्थ तयार करावेत अशी अट स्पर्धेत ठेवण्यात आली होती. त्यानुसार महिलांनी रताळ्यापासून तयार केलेले गुलाबजाम, पॅटिस, पायसम, मोदक, वड्या असे विविध खाद्यपदार्थ तयार केले होते. तसेच राजगिऱ्यापासून लाडू ,उपमा, वड्या, कटलेट आदी स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करण्यात आले होते. याचे परीक्षण जिजामाता मराठा महिला मंडळ अध्यक्ष उषा सावंत आणि सुचिता सावंत यांनी केले. रोहिणी वायकर यांनी राजगिरा पासून तयार केलेला 'उपमा' या पदार्थाला प्रथम क्रमांक आणि श्रद्धा परब यांनी राजगिरापासून तयार केलेल्या 'पॅटीस' ला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष कविता विचारे, सेक्रेटरी ज्योती इंदप आणि खजिनदार सुवर्णा पवार उपस्थित होत्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा