मुंबई-पुणे मार्गावर लवकरच हॅलिकॉप्टर सेवा

अमेरिकेतील फ्लाय ब्लेडतर्फे मुंबई ते पुणे या मार्गावर सुरुवातीला ही हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टला यश मिळाल्यास पुढे मुंबई ते शिर्डी या मार्गावर याचा विस्तार करण्यात येणार आहे.

SHARE

ओला, उबेरनं प्रवास करणं आता कॉमन झालं आहे. जवळचा पल्ला गाठायचा असो वा लांबचा, ओला अाणि उबर सोईस्कर पडते. पण आता तुमच्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे हॅलिकॉप्टरचा. अर्थात हा पर्याय फक्त लांबच्या प्रवासासाठी फायद्याचा आहे. अमेरिकेतील नावाजलेली कंपनी फ्लाय ब्लेड इंक या कंपनीनं मुंबईत हॅलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे.


कसा असेल मार्ग?

फ्लाय ब्लेड ही अमेरिकेतील नावाजलेली कंपनी आहे. अमेरिकेत फ्लाय ब्लेडतर्फे सर्वसामान्यांना प्रवासासाठी हेलिकॉप्टरचा पर्याय उपल्बध आहे. हीच सेवा फ्लाय ब्लेडनं मुंबईत सुरू करण्याचं ठरवलं आहे.  फ्लाय ब्लेड ही अमेरिकन कंपनी भारतातल्या हंट वेंचर्ससोबत गुंतवणूक करत आहे. 

मुंबई ते पुणे या मार्गावर सुरुवातीला ही  हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टला यश मिळाल्यास पुढे मुंबई ते शिर्डी या मार्गावर याचा विस्तार करण्यात येणार आहे. जुहू आणि महालक्ष्मी इथून हेलिकॉप्टर उड्डान करेल. मार्चपर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रीकल व्हर्टिकल टेक ऑफ (Electric vertical take-off) आणि लँडिंग (landing -eVTOL) या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून भारतामध्ये ही सेवा सुरू होणार आहे. 


कमी वेळेत

हॅलिकॉप्टर सेवा सुरू केल्यामुळे विमानतळावर लागणाऱ्या रांगा कमी होतील. रेल्वे किंवा बसनं मुंबईहून पुण्याला जायला चार ते पाच तास लागायचे. पण या सेवेमुळे हा प्रवास अवघ्या ३५ मिनिटांवर येईल. सर्वसामान्यांना या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी याचे तिकिट्स कमी असतील. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडतील अशा माफक दरातच हॅलिकॉप्टरचा प्रवास करता येणार आहे.
संबंधित विषय
ताज्या बातम्या