Advertisement

पौराणिक खेळ खेळायचेत? तर मुंबई विद्यापीठात या!

नवीन पिढीला या खेळांची ओळख व्हावी हा विचार करूनच मुंबई विद्यापिठातील 'सेंटर फॉर एक्स्ट्रा म्युरल स्टडिज' (सीइएमएस)तर्फे प्राचीन भारतीय खेळाचे आयोजन केलं आहे. सहसा ऐकायला, पहायला किंवा खेळण्यास न मिळालेल्या खेळांचा यात समावेश आहे. सीईएमएसची विद्यार्थीनी ज्ञानेश्वरी कामंत हिनं या खेळांचे बोर्ड बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

पौराणिक खेळ खेळायचेत? तर मुंबई विद्यापीठात या!
SHARES

गोरी, विटी दांडूआट्यापाट्या असे अनेक खेळ खेळत आपण लहानाचे मोठे झालो. या खेळांची नुसती नावं ऐकली तरी अनेक जण बालपणीच्या आठवणीत रममाण झाली असतील. पण आजच्या टेक्नोसॅव्ही काळात रमलेली पिढी मात्र हे गेम फक्त ऐकून असेल. आजच्या पिढीला या खेळांची माहिती नसल्यानं ती गंमतही त्यांनी अनुभवली नसणार. क्रिकेट, फुटबॉल आणि मोबाइल गेमच्या जमान्यात जुन्या खेळांचा विसरच पडला आहे

नवीन पिढीला या खेळांची ओळख व्हावी हा विचार करूनच मुंबई विद्यापिठातील 'सेंटर फॉर एक्स्ट्रा म्युरल स्टडिज' (सीइएमएस)तर्फे प्राचीन भारतीय खेळांचं आयोजन केलं आहे. सहसा ऐकायला, पहायला किंवा खेळण्यास न मिळालेल्या खेळांचा यात समावेश आहे. सीईएमएसची विद्यार्थीनी ज्ञानेश्वरी कामंत हिनं या खेळांचे बोर्ड बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.


गोधडीचा बोर्ड

आम्ही या खेळांवर खूप संशोधन केलं. काही पुस्तकांमधून या खेळांबद्दल आम्हाला खूप माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही गेम बोर्ड बनवले. बोर्ड बनवण्यासाठी आम्ही गोधडीचा वापर केला. गोधडीपासून गेमचे बोर्ड बनवणं सोपं नव्हतं. पण आम्ही ते शक्य करून दाखवलं. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन यासाठी तयारी केली. त्यामुळे आम्हाला खूप मजा आली. हा अनुभव आम्ही कधीच विसरू शकत नाही.

- ज्ञानेश्वरी कामंतविद्यार्थीनी


सीईएमएसची आणखी एक विद्यार्थीनी डॉ. राधा सिन्हा यांना या भारतीय प्राचीन खेळाची संकल्पना सुचली.

गेल्यावर्षी आमची सहल उस्मानाबादला गेली होती. इथल्या उपला गावातील चालुक्या मंदिरातील भिंतींवर हे गेम्स लावण्यात आले होते. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही संशोधन केलं. त्यावरून भारतीय प्राचीन खेळांची संकल्पना आम्हाला सुचली.
-डॉ. राधा सिन्हा
विद्यार्थीनी

त्यापैकीच काही खेळांची माहिती आम्ही देणार आहोत.


विटी दांडू

विटी दांडू या खेळात विटी आणि दांडू या दोन गोष्टी असतात. टॉस करून राज्य कुणावर ते ठरवलं जातं. जो टॉस जिंकतो तो पहिल्यांदा विटी उडवतो. या खेळासाठी मैदानात एक खड्डा तयार करायचा. या गलावर विटी आडवी ठेवायची. गलमध्ये ठेवलेली ही विटी दांडूच्या सहाय्यानं उडवायचीसमोर उभ्या असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी तिचा झेल पकडला तर तो खेळाडू बाद. विटीचा झेल घेता आला नाही, तर मग त्या गलवर दांडू आडवा ठेवायचा. मग प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला विटीनं मारण्याचा प्रयत्न करतात. जर दांडूला विटी लागली तर खेळाडू बाद. तो बाद झाला नाही तर विटीनं गुण मिळवायचे


लगोरी

लगोरी हा भारतातील पारंपरिक खेळ असून यास लिंगोरचर असंही म्हणतात. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. या खेळात वापरल्या जाणाऱ्या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. विनासंयोजित खेळांमध्ये फरशीच्या किंवा विटांच्या तुकड्यांचा वापर करता येतो. या खेळात दोन संघ असतातखेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगोऱ्या एकावर एक ठेवणे. फरशीच्या, विटांच्या तुकड्यांनी किंवा लाकड्याच्या संचानं त्या चेंडूने विस्कळीत करणं. परत विरुद्ध बाजूच्या संघानं ज्या चेंडूने लगोरी फोडली आहे, त्याच चेंडूने लगोऱ्या रचणाऱ्या संघास बाद करणं. बाद न होता जो संघ फोडलेली लगोरी अधिकवेळा लावील, तो संघ वियजी होतो

फक्त एवढंच नाही, तर कधी पौराणिक कथा-मालिकांमध्ये वाचले किंवा पाहिलेले सारीपाट, गंजिफा, नवकांकरी, चतुरंग, मोक्षपटम, अष्टपाडानाट अशा खेळांचा देखील यात समावेश आहे. सेंटर फॉर एक्स्ट्रा म्युरल स्टडिजचा विद्यार्थी रामेश राघवन यानं या खेळांबद्दल अधिक माहिती दिली.


नवकांकरी


रोमन साम्राज्यामध्ये हा खेळ खेळला जायचा. २००० सालापूर्वी भारत-रोमन दरम्यान व्यवसायिक संबंध दृध झाले होते. तेव्हा हा खेळ रोमन खलाशी खेळायचे. त्यांच्याकडूनच हा खेळ भारतात आला.


चतुरंग

चतुरंग म्हणजे बुद्धिबळ. चतुरंग म्हणजे सैन्याची चार अंगे. पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ. प्राचीन काळात फक्त भारतातच सैन्यांमध्ये घोडे, उंट आणि हत्ती हे तीनही प्राणी वापरले जात होते. बुद्धिबळाची खेळाची सुरुवात प्रथम भारतात झाली, असं मानलं जातंबुद्धिबळासाठी विविध भाषांत वापरले जाणारे शब्द भारतीय चतुरंग या शब्दापासून तयार झाले आहेत. भारतातून हा गेम पर्शिया आणि युरोप या देशांमध्ये गेला. युरोपमध्ये हा खेळ चेस या नावानं ओळखला जाऊ लागला.


सारीपाट

सोंगट्या, पट आणि फासे किंवा कवड्या यांच्या सहाय्यानं खेळायचा एक जुना बैठा खेळ आहे. हा खेळ प्राचीन काळी भारतात फार लोकप्रिय होता. हल्ली तो काही खेडेगावातच प्रचलित आहे. महाभारतात कौरव-पांडवांच्या काळात हा खेळ 'द्दूत' या नावानं प्रचलित होताया द्यूतात पांडव द्रौपदीसह सर्वस्व पणाला लावून हरले हे सर्वांनाच माहीत आहे. त्या काळात हा खेळ सोंगट्या आणि फासे यांनी खेळला जायचा. हल्ली सोंगट्या आणि फास्यांच्या ऐवजी ६ कवड्यांनी हा खेळ खेळला जातो. लुडो या नावानं हा खेळ सध्या प्रचलित आहे


मोक्षपटम

मोक्षपटम हा खेळ १३ व्या शतकात बनवण्यात आला. जैन धर्मात हा खेळ उदयास आला. अध्यात्म आणि तत्वज्ञानाविषयक विचार रुजवण्यासाठी या खेळाची निर्मिती झाली. या खेळामध्ये शिडी ही आपल्या मधील गुणांद्वारे मिळालेलं यश दर्शवते आणि साप हे आपल्या दुर्गुणांमुळे मिळालेली क्षती दर्शवतात. आपण चांगलं काम केलं की चांगलं फळ मिळतं आणि वाईट वृत्तीमुळे आपल्या मध्ये प्रगती होत नाही ही शिकवण या माध्यमातून दिली जाते.कालांतरानं या खेळामध्ये बदल होत गेले.१८९२ साली हा खेळ भारतातून ब्रिटिश राजवटीत गेला. ब्रिटिशांनी या खेळाला सापशिडी हे नाव दिलं. नवीन रुपात आपल्याला फक्त अंक मोजणी पाहायला मिळते. त्यामधील मूळ उद्देश बाजूला पडला. आता फक्त टाइमपास म्हणून हा खेळ खेळला जातो.

नामोशेष होत असलेले हे खेळ पुन्हा एकदा अनुभवायची संधी मुंबईकरांसाठी चालून आली आहे. जर तुम्हाला भारतीय प्राचीन खेळांचा अनुभव घ्यायचा असेल तर मुंबई विद्यापीठात १६-१७ जूनला भेट द्या.  

कधी - १६ आणि १७ जून २०१८

वेळ - सकाळी  ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

कुठे - मुंबई विद्यापीठ, (प्रेवश विनामूल्य)हेही वाचा-

पेंटबॉल खेळाल तर बाकी गेम विसराल!Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा