Advertisement

बोरिवलीत मासेप्रेमींसाठी अनोखी पर्वणी


SHARES

बोरिवली - मासे पाहण्याची आणि सोबतच ताजे मासे खाण्याची संधी बोरिवलीकरांसाठी उपलब्ध झाली आहे. रंगीबेरंगी मासे, काही गोड्या पाण्यातले मासे तर काही खाऱ्या पाण्यातील असे अनेक प्रजातीचे मासे या प्रदर्शनात आहेत. राजेंद्रनगर परिसरातल्या उतेकर फिशरीज प्रायवेट लिमिटेड कंपनीने एक्वेरियम थिम रेस्टॉरंट उभारले आहे. माशांच्या प्रदर्शनासोबतच तुम्हाला इथे पेटपूजेचीही सोय आहे. एक्वेरियममध्ये एक रेस्टॉरंटही आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारचे एक्वेरियम थिम रेस्टॉरंट मुंबईत उभारण्यात आले आहे. या एक्वेरीयमचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. विनोद तावडेंसोबत खासदार गोपाळ शेट्टीही यावेळी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement