• कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

SHARE

शिव - कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील मुलांनी तयार केलेल्या विविध प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २२ ते २३ डिसेंबर २०१६ ला ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, भौगोलिक, ऐतिहासिक, क्रीडा, मनोरंजन या विषयावर तयार केलेले प्रकल्प मांडण्यात येणार आहेत. यामध्ये इयत्ता चौथी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी काहीतरी वेगळं असं साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

'टिच फॉर इंडिया' या संस्थेमार्फत दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी असे प्रदर्शन अायोजित केले जाते. मुलांना या सर्व विषयांचे योग्य ते ज्ञान आणि माहिती मिळावी हाच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे असे शिक्षिका आशना अग्निहोत्री यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या