दिवस झाला छोटा, रात्र झाली मोठी

 Pali Hill
दिवस झाला छोटा, रात्र झाली मोठी

मुंबई - सामान्यपणे दिवस आणि रात्रीच गणित सारखंच असतं असाच सर्वमान्य समज पाहिला जातो. पण हा एक गैरसमजच आहे. कारण दिवस आणि रात्र यांचं प्रमाण कायम बदलत असतं आणि त्याचाच परिणाम म्हणून 22 डिसेंबर या दिवशी वर्षातला सर्वात छोटा दिवस आणि सर्वात मोठी रात्र अनुभवायला मिळते. याचाच अर्थ गुरूवारी 22 डिसेंबरला सूर्य लवकर मावळणार असून, रात्रीचे चंद्र-चांदण्या खूप लवकर अनुभवायला मिळणार आहेत. खासकरून मोठा समुद्रकिनारा लाभलेल्या मुंबईकरांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल. कारण मुंबापुरीच्या समुद्रकिनारी गुरूवारी सनसेट लवकर होणार असून, तिथेच मुंबईकरांना वर्षातल्या सर्वात मोठ्या रात्रीचं स्वागत करता येणार आहे.

वास्तविक पृथ्वीच्या सू्र्यापासूनच्या अंतरात कायम होणाऱ्या बदलांमुळे हा फरक पडत असतो. पृथ्वी ही कायम सूर्याच्या बाजूने थोडीशी कललेली असते. त्यामुळे बारकाईने निरीक्षण केल्यास वर्षातल्या प्रत्येक दिवशी सूर्याची उगवण्याची जागा किंचित बदलत असते. 22 डिसेंबरला सूर्याचं दक्षिणायण संपून उत्तरायण सुरु होतं. याचा अर्थ सूर्याची किरणं पृथ्वीवर सर्वाधिक तिरपी पोहोचत असतात आणि पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात ती जवळपास सरळ पडतात. त्यामुळे पृथ्वीच्या इतर भागात दिवस खूप लहान होतो आणि रात्र मोठी होते. त्यानंतर लगेचच सूर्याचं उत्तरायण सुरु होतं. याचाच अर्थ पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता हळूहळू दक्षिणेकडे कलू लागते.

याचाच परिणाम म्हणून 22 मार्च आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी दिवस आणि रात्र हे समान म्हणजेच 12 तासांचे असतात.

Loading Comments