Advertisement

ओले बदाम खाण्याचे फायदे वाचाल, तर थक्क व्हाल!


ओले बदाम खाण्याचे फायदे वाचाल, तर थक्क व्हाल!
SHARES

सुका मेवा हा तेलकट आणि चरबी वाढवणारा असल्याचं मानलं जातं. पण काजू सोडल्यास अन्य कुठल्याही सुक्या मेव्याने चरबी वाढत नाही. सुक्या मेव्यामधील बदामात सर्वात कमी चरबी असते. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिनं असतात. त्यामुळे डाएटमध्ये देखील डॉक्टर बदाम खाण्याचा सल्ला देतात. कोरडे बदाम खाणं देखील शरीरासाठी फायदेशीर आहे. पण भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले, तर त्यात जास्त औषधी गुणधर्म तयार होतात. त्यामुळे रोज सकाळी पाण्यात भिजवलेले बदाम खावेत. रात्री झोपताना बदाम पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे बदाम खा.



) बदाम स्मरणशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते. बदाम नियमित खाल्यानं डोळे तेजस्वी होतात

) बदामाच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपताना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतलं तर सर्दी कमी होते

) बदामाने काही काळ भूक भागवता येते. त्यामुळे भूक लागल्यावर काही अरबट चरबट खाण्यापेक्षा भिजवलेले बदाम खावेत. तात्पुरती भूक भागते


) डाएटमध्ये देखील डॉक्टर बदाम खाण्याचा सल्ला देतात. ब्रेकफास्टला तुम्ही १२-१५ बदाम खाल्ले तरी खूप आहे. एवढे बदाम म्हणजे तुमचा एकवेळचा ब्रेकफास्ट झाला

) मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेव्हल नियंत्रणात राहते

) ओल्या बदामाची साल अनेक जण काढून टाकतात. पण असं न करता ती बदामासोबत खावी. यामुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यास मदत होते

) बदामामध्ये तांब्याचं प्रमाण जास्त असतं. बदाम रक्त शुद्ध करण्यास मदत करते.


) बदामाच्या सेवनाने केस गळण्याचं प्रमाण कमी होतं

) बदामातील अॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते आणि हृदयविकारांपासून बचाव होतो

१०) गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाल्ल्यास तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील ते आरोग्यदायी ठरतं. बदामातील फॉलिक अॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ करण्यास मदत करते. भिजवलेले बदाम मऊ असल्यानं गरोदर स्त्रियांना पचायला त्रास होत नाही.

११) रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. बदामातील अल्फा टेकोफेरॉल्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्यांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते



हेही वाचा-

'हे' ९ पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा