Advertisement

हे ९ पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नका


हे ९ पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नका
SHARES

फ्रिज हा आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा घटक आहे. पदार्थ ताजे, टवटवीत आणि खराब होऊ नये म्हणून आपण फ्रिजचा वापर करतो. पण तुम्हाला माहित आहे का? सर्वच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. कमी तापमानात अन्नाचा नाश करू शकणारे सूक्ष्मजीव आणि जीवाणू वाढू शकत नाहीत. त्यामुळे आपण सर्वच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतो. पण हा नियम सर्वच पदार्थांसाठी लागू होत नाही. काही पदार्थ तुम्ही फ्रिजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नसतेआम्ही तुम्हाला आज अशाच काही पदार्थांची यादी देणार आहोत जे पदार्थ फ्रिजमध्ये न ठेवता देखील चांगले राहू शकतात


) कलिंगड

कलिंगड कापलेला असो किंवा नसो पण तो फ्रिजमध्ये ठेवणं घातक आहे. २००६ साली यू. एस. डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरनं केलेल्या एका संशोधनातून असं समोर आलं आहे की, साधारण तापमानात ठेवण्याऐवजी फ्रिजच्या थंड तापमानात ठेवल्यास कलिंगडात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सिडेंट्स तयार होतात. त्यामुळे कलिंगड फ्रिजमध्ये न ठेवणंच योग्य आहे


) टोमॅटो


न पिकलेले टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवण्यापेक्षा ते बाहेर ठेवावेत. त्यामुळे ते पिकत असताना अधिक चविष्ट होतात. खूप थंड वातावरणात टोमॅटो चांगले पिकत नाहीत. टोमॅटो एकदा पूर्ण पिकले की ते तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता.


) बटाटा

आता काय म्हणायचं, काही जणं बटाटा देखील फ्रिजमध्ये ठेवतात. पण फ्रिजचे तापमान बटाट्याच्या स्टार्चला ब्रेक करतं. त्यामुळे बटाटा गोड लागतो. फुड स्टँडर्ड एजन्सीनुसार फ्रिजमध्ये ठेवलेला बटाटा शिजवल्यास त्यात एक्रायलामाइट नावाचा हानिकारक केमिकल तयार होते. या केमिकलमुळे कॅन्सरसारखा आजार उद्भवू शकतो


) ब्रेड


अनेकदा आपण उरलेला ब्रेड फ्रिजमध्ये ठेवतो. पण फ्रिजमध्ये ठेवण्यापेक्षा ब्रेड, पाव बाहेर ठेवलेलेच चांगलेफ्रिजमध्ये ठेवल्यामुळे ब्रेड किंवा पाव चामट आणि कडक होऊ शकतोथंडावा आणि आद्रतेमुळे ब्रेड आणि पाव शिळा होऊ शकतो.  


) काजू आणि सुकामेवा


काजू आणि सुकामेवा खवट होऊ नये म्हणून अनेक जण तो फ्रिजमध्ये ठेवतात. पण यामुळे काजू आणि सुकामेव्याचा खुसखुशीतपणा कमी होतो. शिवाय फ्रिजमधल्या इतर पदार्थांचा वास त्यांना लागायची शक्यता असते. त्यामुळे काजू आणि सुका मेवा हवाबंद पिशवीत ठेवावा


) केचप आणि सॉस


बहुतेक वेळा सॉस आणि केचपमध्ये विनेगरचा वापर केलेला असतो. त्यामुळे त्याला फ्रिजमध्ये ठेवू नका.

) कॉफी


कॉफीला हवाबंद डब्यामध्ये ठेवाफ्रिजमध्ये कॉफी ठेवल्यास ती घट्ट होते.


) मध


मध हा नैसर्गिक पदार्थ आहे. त्यामुळे त्याला फ्रिज ठेवण्याची काही गरज नसते.  फ्रिजमध्ये ठेवल्यानं मध घट्ट होते.


९) अंडी


अनेकजण अंडी फ्रिजमध्ये ठेवतात. पण त्याची काहीच आवश्यकता नाही. अंडी बाहेर ठेवलेली चांगली. पण जास्तीत जास्त एक आठवडा अंडी बाहेर ठेवता येतात. एक आठवड्याहून अधिक काळ अंडी ठेवू नयेत.  



हेही वाचा

तुम्ही भेसळयुक्त पदार्थ तर नाही खात ना? अशी ओळखा भेेसळ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा