Advertisement

सिंगल्स...आर यू रेडी टू मिंगल?

सिंगल डेटिंग काय असतं? कुणी एकटं का जाईल बरं डेटला? अर्थात डेटिंगला जाण्यासाठी एखादा साथीदार लागतो. मग सिंगल डेटिंग ही काय संकल्पना आहे? असं बरंच काही तुमच्या डोक्यात चालत असेल. पण तुम्ही अगदी सिंगल डेटिंग या नावावर जाऊ नका. सिंगल डेटिंग ही संकल्पनाच हटके आहे!

सिंगल्स...आर यू रेडी टू मिंगल?
SHARES

फेसबुक आणि व्हॉट्सअॅप सारख्या साईट्सवर डेटिंग करणं अनेकांना महागात पडलं आहे. याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण आम्ही तुम्हाला आज डेटिंगची एक नवीन पद्धत सांगणार आहोत ती म्हणजे 'सिंगल डेटिंग'! सिंगल डेटिंग काय असतं? कुणी एकटं का जाईल बरं डेटला? अर्थात डेटिंगला जाण्यासाठी एखादा साथीदार लागतो. मग सिंगल डेटिंग ही काय संकल्पना आहे? असं बरंच काही तुमच्या डोक्यात चालत असेल. पण तुम्ही अगदी सिंगल डेटिंग या नावावर जाऊ नका. सिंगल डेटिंग ही संकल्पनाच हटके आहे!


सिंगल डेटिंग म्हणजे काय?

फेसबुक आणि डेटिंग अॅपच्या माध्यमातून बहुतेक जण प्रेमात पडतात. अशा साईट्सवर चॅट करता करता एकमेकांशी अनेक खाजगी गोष्टी शेअर केल्या जातात. पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीशी भेटल्यावर अनेकांना फसवल्याचं लक्षात येतं. अशा अनेक घटना उघड झाल्या आहेत. पण वॅलियन ज्वेलरी ब्रँडच्या संस्थापिका नित्या अरोरा यांनी एक हटके संकल्पना आणली आहे. नित्या अरोरा यांनी त्यांच्या दोन मैत्रिणी शान खन्ना आणि हॅना स्ट्रॉमगन यांच्या मदतीनं सिंगल डेटिंग ही संकल्पना सुरू केली.ज्यांना साथीदाराची गरज आहे असं वाटत आहे, त्यांनी फक्त एवढंच करायचं आहे की आपला बायोडेटा BoutiqueSinglesClub@gmail.com ला पाठवायचा आहे. त्यासाठी त्यांची अट म्हणजे तुम्ही सिंगल असणं आवश्यक आहे. बायोडेटामध्ये दिलेल्या माहितीत तथ्य असणं आवश्यक आहे. तुम्ही पाठवलेली एकूण एक माहिती सिंगल क्बची टीम तपासून पाहते. तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाते.


रोज ४ ते ५ बायोडेटा येत असतात. बायोडेटात नाव, फोटो, वय, फॅमिली थोडक्यात सर्व माहिती देणं आवश्यक असतं. या बायोडेटापैकी काही बायोडेटा आम्ही निवडतो. त्यानंतर आम्ही एक खाजगी पार्टी अरेंज करतो. या पार्टीत २५ तरूण आणि २५ तरूणींना सहभागी करून घेतलं जातं. पार्टीत प्रत्येक जण स्वत: त्यांचे साथीदार शोधतात. पार्टीमध्ये त्यांची एकमेकांसोबत ओळख होते. या भेटीत एकमेकांच्या आवडी निवडी ते शेअर करतात. हळूहळू त्यांची ओळख वाढते. काही जणांना मिक्सअप व्हायला वेळ लागतो. सो अशा वेळी आम्ही छोटे-मोठे गेम्स ठेवतो. जेणेकरून ते एकमेकांसोबत अधिक खुलतात. पार्टीत भेटल्यानंतर रिलेशनशीप पुढे घेऊन जायचं असेल, तर तो त्यांचा निर्णय असतो. अनेकवेळा असं झालंय की, आमच्या या संकल्पनेमुळे खूप जणांमध्ये चांगली मैत्री झाली आहे.


नित्या अरोरा, ज्वेलरी डिझायनर


सिंगल डेट्स क्लब सात ते आठ वर्षांपूर्वी सुरू झाला. सिंगल क्लब टीमचा प्रयत्न असतो की दर महिन्याला एखादी पार्टी अरेंज करायची. पण शक्य नसल्यास दोन महिन्यात एखादा इव्हेंट अरेंज केला जातो. इव्हेंटच्या अधिक माहितीसाठी सिंगल्स क्लबच्या फेसबुक पेजलाही तुम्ही भेट देऊ शकता. बायोडेटा पाठवल्यानंतर तुमची निवड झाली आहे की नाही हे तुम्हाला मेलवरच कळते. पार्टी अरेंज करण्यासाठी सिंगल क्लब १ हजार ते १० हजार रुपये आकारतात.

सो तुम्ही सिंगल आहात आणि एका साथीदाराच्या शोधात आहात? मग BoutiqueSinglesClub@gmail.com वर नक्की आपला बायोडेटा मेल करा! हेही वाचा

डेटवर जाताय? लक्षात ठेवा या ८ गोष्टी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा