Advertisement

डेटवर जाताय? लक्षात ठेवा या ८ गोष्टी


डेटवर जाताय? लक्षात ठेवा या ८ गोष्टी
SHARES

ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस अखेर उजाडला. उठल्यापासूनच तयारीला सुरूवात केली होती. काय घालू? काय नको घालू? कोणत्या रंगाची लिपस्टीक लावू? कसा मेकअप करू? केसांची हेअरस्टाईल कशी करू? याचाच विचार किती तरी वेळ करत होते. डोळ्यासमोर बरेच कपडे होते पण त्यातलं नेमकं काय घालू हेच कळत नव्हतं. पहिली डेट होती ना त्यामुळे खूप कनफ्यूज होते. मग काय शेवटी एका मैत्रिणीला कॉल केला. म्हटलं तिच्याकडून काही टिप्स घ्याव्यात. फॅशन आणि डेटिंगचा तिचा अनुभव तसा तगडा होता! मग मॅडमनं सांगितलं तसं तयार होऊन गेले. पण पाहते तर काय माझा 'प्रिन्स चार्मिंग' अजागळासारखा आला होता. वाढलेली दाडी काय! अजागळासारखे कपडे आणि शर्टावर तर कसला तरी डाग पडला होता. एका छानशा हॉटेलमध्ये आम्ही गेलो पण त्याचं अर्ध लक्ष मोबाईलमध्येच होतं. माझ्यासोबत डेटला आला होता की मोबाईलसोबत तेच कळत नव्हतं. एँड ऑफ द डे पहिला डेटचा अनुभव खूप वाईट होता. असा अनुभव अनेकांना आलाच असेल. डेटवर असे गेलात तर नक्कीच तुमची फर्स्ट डेट ही लास्ट डेट ठरू शकते. त्यामुळे तुम्ही डेटवर जाताना कसे तयार होता हे खूप महत्त्वाचे आहे. डेटिंगसाठी काही एटिकेट असतात. ते पाळणं गरजेचं आहे.

कसे कपडे घालाल?

डेटवर जाताना कम्फर्टेबल कपड्यांची निवड करा. ज्यात तुम्हाला नीट बसता आणि चालता येईल असेच कपडे परिधान करा. उगाचच गडद रंग, लाऊड मेकअप, न झेपणाऱ्या आणि शोभणाऱ्या अॅक्सेसरीज यांचा प्रयोग टाळा. या बाबतीत कोणा फॅशन एक्सपर्ट मित्रमैत्रिणीचं ओपिनियन घेतलेलं केव्हाही चांगलं. मुलांनी केसांची हेअरस्टाईल टिकवून ठेवण्यासाठी जेलचा अतिवापर टाळावा. मुलींनी डेटवर जाताना आयब्रो केले पाहिजेत. खास करून मुलांनी नाकाच्या बाहेर आणि कानावर येणारे केस काढले पाहिजेत. मुलांनी शेव्ह करणं आवश्यक आहे. झुडपासारखी वाढलेली दाढी घेऊन डेटवर जाऊ नका. ती किंवा तो दोघांनीही दात फ्लॉसिंग करायला विसरू नका. त्यामुेळे तुमचे दात अधिक पांढरे दिसतील.

बी पंक्चुयल

समोरच्या व्यक्तीला दिलेली वेळ नक्की पाळा. कारण तुमच्यासाठी समोरची व्यक्ती वेळात वेळ काढून आलेली असते. त्यामुळे त्याच्या वेळेची कदर करणे आवश्यक आहे. उशीर होणार असेलच तर त्याची पूर्व कल्पना देणे योग्य ठरेल. नाहीतर पहिल्याच डेटवर उशीरा गेलात तर तुमचे इमप्रेशन वाईट पडेल.

'मी' पुराण नको

डेटवर गेल्यावर स्वत:चा पाढा गिरवू नका. मला हे आवडतं, ते आवडतं, माझे मित्र, छंद, शिक्षण याबद्दल बडबड करत बसू नका. तुमची डेट बोर होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही त्याच्या आवडी-निवडी विचारा. तो किंवा ती काय बोलत आहे हे ऐकून घ्या. बोलण्यासाठी हलकेफुलके विषय निवडा. डिबेटला आल्यासारखे स्वत:चे ओपिनियन थोपू नका. समोरच्या व्यक्तीचे ओपिनियन पण ऐकून घ्या.

मोबाईलला ब्रेक द्या

डेटवर गेल्यावर मोबाईलमध्ये वारंवार डोकावणं टाळा. ज्या व्यक्तीशी गप्पा मारण्यासाठी तुम्ही भेटलात ती किंवा तो समोर असतानाही तुमचं मोबाईलमध्ये डोकावणं चांगलं नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटेल की तुम्हाला त्याचात इंटरेस्ट नाही. डेटवर असताना व्हॉट्सअप, फेसबुक आणि ट्वीटर यापासून चार हात लांब रहा. त्यापेक्षा तुमच्यासाठी वेळात वेळ काढून आलेल्या व्यक्तीसोबत काही आनंदी क्षण घालवा.

सीआयडी असल्यासारखं वागू नका

एकमेकांबद्दल सीआयडीसारखी चौकशी करू नका. तुझे आधीचे रिलेशनशिप्स का तुटले? तुझे किती बॉयफ्रेंड्स होते किंवा किती गलफ्रेंड होत्या? या सर्वांची चौकशी करत बसू नका. स्वत:हून तर अजिबात हे सांगत बसू नका. भूतकाळात रमण्यापेक्षा वर्तमानात जगा. एकमेकांची कंपनी एन्जॉय करा.

अॅटिड्यूड जरा जपूनच

राग, चिडचिड आणि गर्व यांना आवर घाला. समोरच्याशी बोलताना अॅग्रेसिव्ह होऊ नका. आयुष्यात तुम्ही कितीही चांगलं काम करा पण त्याचा गर्व करू नका. तुमच्या मनासारखं होत नसेल तर चिडू नका. डॉमिनेट होऊ नका. त्यामुळे त्याला किंवा तिला एखाद्या कैदेत असल्यासारखं वाटेल.

दिखाऊपणा करू नका

डेटवर उगाचच दिखाऊपणा करू नका. समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या हामध्ये हा करू नका. तुम्हाला कोणती गोष्ट माहित नसेल तर माहित नाहीच असे स्पष्ट सांगा. खोटं बोलाल आणि उगाच तोंडघशी पडायची वेळ येईल.

इमोशन्सवर नियंत्रण ठेवा

पहिल्याच डेटमध्ये स्वत:च्या इमोशन्सवर नियंत्रण ठेवा. पहिल्या डेटमध्ये हात पकडणे, किस करणे किंवा सेक्स करमे अशा भावना जागृत होतात. त्यात काही चुकिचं नाही. पण समोरची व्यक्ती कमफर्टेबल असेल की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. शक्यतो पहिल्याच भेटीत त्याच्या किंवा तिच्यासोबत जास्त जवळीक साधू नका. 

जर तुमची डेट खूपच सुंदर झाली असेल तर हात पकडू शकता किंवा गालावर चुंबन देऊन आपलं प्रेम व्यक्त करू शकता. पण पहिल्या भेटीत सेक्स संदर्भात बोलणं टाळाच. या गोष्टी करण्यासाठी आयुष्य पडलंय.

डेटिंग हे प्रकरण तसं डोईजडच आहे. बट नॉट टू वरी. या टिप्स तुम्ही फॉलो कराल तर तुमची फर्स्ट डेट लास्ट डेट तरी ठरणार नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा