मांजरप्रेमींसाठी खास 'कॅट कॅफे'!

वर्सोवा - मांजर तर आपण नेहमीच पाहत आला असाल. तुम्हाला मांजर पाळण्याची आवडही असेल. मात्र तुम्ही 'कॅट कॅफे' पाहिलाय का? कदाचित तुम्ही थोडं विचारात पडला असाल की हे 'कॅट कॅफे' आहे तरी काय? मात्र अंधेरीच्या वर्सोव्यामध्ये असाच एक 'कॅट कॅफे' स्टुडिओ तयार करण्यात आला आहे. 

हा 'कॅट कॅफे' बनलाय भटक्या मांजरांचं घर. जायफर स्टुडिओने हा 'कॅट कॅफे' तयार केला आहे. विशेष म्हणजे या कॅफेमध्ये तुम्हाला चविष्ट खाद्य पदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे. तसच तुम्ही या कॅफेतील मांजरांसोबत वेळही घालवू शकता.

एवढंच नाही तर तुम्हाला तुमच्या घरी मांजर आणायचं असेल तर 1 आणि 2 एप्रिलला या कॅफेमध्ये खास अॅडॉप्शन कॅम्प देखील लावण्यात आला आहे.

Loading Comments