सेलिब्रेटिंग वुमनहूड...

 Kings Circle
सेलिब्रेटिंग वुमनहूड...
Kings Circle, Mumbai  -  

शीव - जागतिक महिला दिनानिमित्त येत्या 5 मार्चला किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात सेलिब्रेटिंग वुमनहूड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री षण्मुखानंद फाईन आर्टस् आणि संगीत सभा यांच्यातर्फे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या तरुण-तरुणींना सन्मानित करण्यात येणार आहे. तसंच चौरंग प्रस्तुत "माय मराठीच्या लेकी" हा म्युझिकल शो ही येथे सादर केला जाणार आहे. दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Loading Comments