ये स्टाइल का मामला है...

मुंबई -  गेल्या काही वर्षांत तापमानात झालेल्या बदलामुळे थंडी हा ऋतू जणू गायबच झाला होता. मात्र या वर्षी मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे थंडीच्या स्वागतासाठी मुंबईकर आणि बाजारही बऱ्यापैकी सज्ज झालेला दिसतोय. बाजारात मोठ्या प्रमाणात फॅशनेबल स्वेटर विक्रीसाठी उपलब्ध झालेत. वेगवेगळ्या स्टाइलच्या या स्वेटर्सना तरुणांची चांगली पसंती मिळतेय. थंडी तर पडू लागलीये आणि तुमचं स्वेटरचं शॉपिंग झालं नसेल तर चला बाजारात आणि घेऊन टाका एखादा छान, फॅशनेबल स्वेटर...

Loading Comments