Advertisement

नशा को कहो अलविदा


नशा को कहो अलविदा
SHARES

गोरेगाव - महानंद डेअरीतील कर्मचाऱ्यांसाठी नशामुक्ती शिबीर राबवण्यात आली. गोरेगाव पूर्व महानंद डेअरीमध्ये महाराष्ट्र श्रमिक सेनेच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी डॉ. चेतन मंत्री यानी तंबाखू, सिगारेट, दारू, पान, गुटखा यांसारख्या व्यसनांचे दुष्परिणाम या विषयावर ४० मिनिटांचं व्याख्यान देऊन उपस्थित कर्मचारी वर्गाच्या प्रश्नाचं निरसनही केलं. महानंद डेअरीतील शेतकरी भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. या शिबिरात मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी भाग घेतला आणि व्यसनमुक्तीची शपथ घेतली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा