लीना प्रभू लिखित 'माय पाथ टू प्रजना' पुस्तकाचं प्रकाशन

  Bandra
  लीना प्रभू लिखित 'माय पाथ टू प्रजना' पुस्तकाचं प्रकाशन
  मुंबई  -  

  मुंबई - लीना प्रभू लिखित 'माय पाथ टू प्रजना' या नावाच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, माजी कसोटीपटू करसन घावरी, दिलीप वेंसरकर, विनोद कांबळी, सलील अकोला, फिल्म निर्देशक सुधीर मिश्रा, अभिनेता दिलीप तोहील यांनी हजेरी लावली.

  लीना प्रभू गेली 7 वर्ष हे पुस्तक लिहित होत्या. त्यांनी आपले पहिले पुस्तक त्यांचे दिवंगत वडिल आणि माजी महापौर रमेश प्रभू यांना अर्पण केलं आहे. शनिवारी एबी सेलेस्टीअल तरंगते हॉटेल आणि पुस्तक प्रकाशन सोहळा एकाच वेळी झाला. भावना आणि अध्यात्मकता यांची सांगड कशी आहे, अध्यात्मकतेच्या आधारे कशा प्रकारे 'प्रजना' प्राप्ती होईल, याची माहिती या पुस्तकातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळेच सात वर्षापासून लीना प्रभू आपले पहिले पुस्तक लिहित आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.