Advertisement

आयुष्यातील हे महत्त्वाचे फॅक्ट्स माहित आहेत का?


आयुष्यातील हे महत्त्वाचे फॅक्ट्स माहित आहेत का?
SHARES

आपल्या आयुष्यात आसपास असा अनेक गोष्टी आहेत ज्याकडे आपण कधी लक्ष देत नाही. लक्ष देत नाही म्हणण्यापेक्षा आपण कधी निरखून पाहत नाही. आपल्याला त्याबद्दल अनेक प्रश्न पडत असतात. पण त्याची उत्तरं मिळवण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही. मग तुम्ही कुठल्या कामाच्या व्यापात असाल किंवा इतर कुठल्या कारणास्तव असेल आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. पण आम्ही आहोत ना तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला.


) तुमच्याकडे आयफोन आहे? मग आयफोनचा मागचा कॅमेरा आणि फ्लॅशच्या मध्यभागी एक छोटे छिद्र असते. हे छिद्र कशासाठी असतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? असेलही पडला.


तर रिअर कॅमेऱ्यानं व्हिडिओ बनवताना आवाज रेकॉर्ड करण्याचं काम करता यावं यासाठी हे छिद्र असतं.

) युएसबीवर त्रिशूलसारखा एक लोगो तुम्ही कधी पाहिला आहे का? युएसबी तर आपण सर्वच वापरतोत्यावर हा लोगो तुम्हाला नक्कीच आढळेल. अनेकांना वाटतं की हा कुठल्या कंपनीचा लोगो आहे. पण तसं नाही.

हा लोगो यासाठी की, त्रिशूल हे चिन्ह शक्ती दर्शवतो. त्याचप्रमाणे यूएसबीवरील हा लोगो टेक्नोलॉजीच्या शक्तीला दर्शवतो


) बार्बी डॉल तर सर्वांनाच माहित असेल. तुम्ही कधी तरी आपल्या मुलीला किंवा तुम्ही लहान असताना कुणीतरी गिफ्ट म्हणून बार्बी दिली असेल. बार्बीसोबत खेळत अनेकजण लहानाचे मोठे झालो. पण या बार्बीचं पूर्ण नाव आजपर्यंत कुणाला माहित नसेल.


बीर्बीला बनवणाऱ्या मॅटल या कंपनीनं बाहुलीचे नाव बार्बरा मिलीसंट रॉबर्ट ठेवलं. बीर्बीचे आई-वडील देखील आहेत. जॉर्जे आणि मार्गरेट रॉबर्ट असं नाव आई-वडिलांचं अाहे. 


) टाळ्याच्या खाली एक छोटंसं छिद्र असतं ते का असतं माहित आहे का? पावसाळ्यात टाळ्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते. ते पाणी टाळ्यात साचून राहू नये यासाठी त्याला खालच्या बाजूला एक छोटंसं छिद्र असतं. या छिद्रातून पाणी निघून जातं. त्यामुळे टाळा गंजत देखील नाही.



) स्नीकर हा ब्रँड तर सर्वांनाच माहित आहे. आपल्यापैकी अनेकजण स्नीकरचे सूज नक्कीच वापरत असतील. पण या शूजला स्नीकर हे नाव का बरं पडलं असेल?



स्नीकरचा अर्थ होतो की गुप्तपणे काहीही करणे. तुम्ही जे करत आहात त्याची कानोकान कुणाला खबर लागली नाही पाहिजे. त्यामुळे याला स्नीकर हे नाव देण्यात आलं. 


) तुम्ही जर कधी लक्ष दिलं असेल तर तुम्हाला प्लास्टिक बाटलीच्या झाकणात एक रबराची डिस्क लावलेली दिसेल. पण ही रबराची डिस्क झाकणात का लावली जाते

तर ही डिस्क लावण्यामागचं कारण असं आहे की, त्या बाटलीतील कार्बोनेशन उडून जाऊ नये ते टिकून रहावं. कोल्ड्रिंकच्या प्लास्टीकच्या बाटलीच्या झाकणात ती रबरची डिस्क नसेल तर त्याचा फिज उडून जातो.    



हेही वाचा

'हे' ९ पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नका


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा