कुत्र्यांचं गेट टुगेदर!

Mahalaxmi, Mumbai  -  

रेसकोर्स - आजवर तुम्ही अनेक प्रकारचे प्रदर्शन पाहिले असेल. विविध वस्तूंचे, झाडांचे, कपड्यांचे अशा अनेक प्रदर्शनांमध्ये तुम्ही फिरला असाल. पण महालक्ष्मीच्या रेसकोर्सवर एक आगळंवेगळं प्रदर्शन भरलं होतं. कोणत्याही वस्तूचं, कपड्यांचं नाही तर चक्क कुत्र्यांचं! आश्चर्य वाटलं ना? या प्रदर्शनाचा आनंद डॉग प्रेमींनी तर घेतलाच शिवाय त्यांच्या लाडक्या डॉगीलाही ते या प्रदर्शनात फिरायला घेऊन आले होते. 'द बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएलिटी अगेन्स्ट अॅनिमल' या संस्थेतर्फे हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यावेळी कुत्र्यांना लागणाऱ्या विविध वस्तूही इथे ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कुंत्र्यांचे कपड्यांपासून ते केस विंचरण्याचे कंगवेही विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी भटक्या कुत्र्यांनाही काही डॉग प्रेमींनी दत्तक घेतले.

Loading Comments