गारेगार पाणी कधीही, कुठेही, केव्हाही!

मुंबई - मुंबईत उन्हाळा सुरु झाल्यापासून दिवसेंदिवस तापमानात अशी काय वाढ होऊ लागली आहे की घरातून बाहेर पडायलाही नकोस वाटू लागले आहे. दुपारच्या वेळेत घरातून बाहेर पडणे तर मुश्किलच झाले आहे. त्यातच दिवसेंदिवस वाढणाऱ्या या अशा उन्हात पाण्याची तहान भागवण्यासाठी लोक काय काय करतात. पण पाण्याची तहान काही भागत नाही. त्यातच अगदी बर्फाचं पाणी जरी भरून घेतलं तरी वाढत्या तापमानात त्या थंड पाण्याचं गरम पाणी होऊन जातं आणि त्याने तहान भागत नाहीच. अशा वेळी आपल्याला थंड पाणी मिळालं तर? हो म्हणजे कितीही तासानंतर तुमच्या बाटलीतल पाणी थंड राहील तर.

धारावीतल्या अब्बास गालवानी या कुंभाराने अश्या बाटल्या बनवल्या आहेत. बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांच्या दरातच या बाटल्या उपलब्ध असल्याने अगदी कोणालाही घेणं शक्य आहे. याचा आकारही सर्वसामान्य बाटल्यांसारखाच असल्याने त्या तुमच्या बॅगेत ही राहू शकतील आणि ऑफिसच्या डेस्कवरची शोभा ही वाढवतील.Loading Comments