या जाहिरातींच्या पंचलाईन आठवतात का?

  Mumbai
  या जाहिरातींच्या पंचलाईन आठवतात का?
  मुंबई  -  

  दिवसेंदिवस जाहिरातींची क्रेझ वाढतच चालली आहे. आजच्या काळात जाहिरातींना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या जाहिरातीही प्रेक्षकांच्या मनावर चांगल्या प्रकारे छाप पाडतात. काही वेळा तर प्रेक्षक जाहिरातींच्या इतक्या प्रेमात पडतात की, त्या जाहिरातींच्या टॅग लाईन ते रोजच्या बोलण्यात सहज वापरतात. काही जाहिरातींची पंच लाईन आपल्याला अगदी तोंडपाठ होते. प्रेक्षक या जाहिरातींच्या इतक्या प्रेमात पडतात की, या जाहरातींचे व्हिडिओ प्रेक्षक आवडीनं यु-ट्युबवरही पाहतात. चला तर मग अशाच काही जाहिरातींवर टाकूयात एक नजर.

  1) क्या आपके टुथपेस्ट में नमक है?


  कोलगेटच्या टुथपेस्टची ही टॅगलाईन प्रेक्षकांना चांगलीच लक्षात असेल. अगदी मजा मस्तीमध्ये कॉलेजची तरूण मंडळी एकमेकांना हा डॉयलॉग मारताना तुम्ही पाहिली असतील. तरूणच काय, अगदी तुम्हीसुद्धा मस्करीत हा डायलॉग कुणाला तरी मारला असेल

  2) हम क्लोरमिंट क्यों खाते है?

  क्लोरमिंटची जाहिरात तर खूपच प्रसिद्ध झाली होती. 'हम क्लोरमिंट क्यो खाते है?' हा प्रश्न आजही अनेकांना सतावतो. मित्रांमध्ये तर ही टॅगलाईट खूपच हिट ठरली आहे. मस्करी म्हणून अनेकदा आपण आपल्या मित्राला या टॅगलाईनवरुन चिडवतोही!

  3) मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है?


  मेलोडी इतनी चॉकलेटी क्यो है? या प्रश्नाचं उत्तर तर स्वत: कंपनीला देखील माहिती नसेल. पण जाहिरातीत वापरलेली पंच लाईन प्रचंड चालली. बच्चे कंपनीपासून ते आबाल वृद्धांना फक्त एकच प्रश्न सतावत होता आणि तो म्हणजे मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है?

  4) क्या आप क्लोजअप करते है?

  कोलगेटच्या जाहिराती दरम्यानच क्लोजअपची जाहिरात आली होती. दोन्ही जाहिराती एकाच वेळी प्रदर्शित झाल्या होत्या. पण तरीही दोन्ही जाहिरातींची लोकांमध्ये चांगलीच क्रेझ होती

  5) थंडा मतलब...?

  थंडा मतलब....? या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरजच नाही. कारण याचं उत्तर तर प्रत्येकाला नक्कीच माहिती असेल. कोकाकोलाच्या या जाहिरातीत आमिर खाननं विचारलेला प्रश्न अनेकांना कायमचाच लक्षात राहिला. बच्चे कंपनीच्या तर अगदी तोंडपाठ झाला होता हा डायलॉग.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.