Advertisement

'इथं' आहे मोफत वाचनालय

वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी अनेक प्रयोग होत असताना आपण पाहातो. असाच एक प्रयोग भांडुपमध्ये 'रीड अॅन शेअर' या नावाखाली सुरु असून यामध्ये तुम्हाला थेट पुस्तकं मोफत वाचता येणार आहेत. यासाठी तुम्हाला सभासद होण्याची किंवा कोणतंही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

'इथं' आहे मोफत वाचनालय
SHARES

तुम्हाला वाचनाची आवड आहे? परंतु एखाद्या वाचनालयाचे सभासद होणं तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल, तर मोफत वाचनालय हा पर्याय उत्तम आहे. आम्ही तुमच्यासाठी असच एक वाचनालय घेऊन आलो आहोत. जिथे तुम्ही मोफत वाचन करू शकता!


नक्की काय आहे संकल्पना?

वाचन संस्कृती तरुणांमध्ये रुजावी यासाठी भांडुपमध्ये 'रीड अॅन शेअर' या नावानं वाचनालय सुरू करण्यात आलं आहे. 'रीड अॅन शेअर' या वाचनालयात तुम्ही मोफत वाचन करू शकता. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच या वाचनालयाचा लाभ घेऊ शकतात. क्राइम नॉव्हेल्स, कल्पनात्मक पुस्तकं, रोमँटिक कथा अशी अनेक पुस्तकं इथं उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पुस्तकं वाचायला ना तुम्हाला सदस्य व्हावं लागणार, ना पैसा भरावा लागणार!

फक्त एवढंच नाही, तर तुम्ही वाचनालयातून एखादं पुस्तक एका आठवड्यासाठी घरी देखील घेऊन जाऊ शकता. याशिवाय तुमच्याकडे असलेली पुस्तकं या वाचनालयाला दान करू शकता. जेणेकरून वाचकांना वाचण्यासाठी पुस्तकं उपलब्ध होतील.


कुठे आहे वाचनालय?

तुम्हाला सुद्धा मोफत पुस्तकं वाचायची असतील, तर या वाचनालयाला नक्की भेट द्या. नाहूर स्टेशनच्या बाजूला म्हणजेच भांडुपच्या हिरानगर इथं 'रीड अॅन शेअर' हे वाचनालय नुकतंच उभारलं आहे.



हेही वाचा

आता घरपोच वाचनालय!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा