कपकेक, चॉकलेट्स आणि बरंच काही...

Pali Hill, Mumbai  -  

वांद्रे - मॅकारुन्स, बिसकॉटीज, कपकेक, लाँजेस. वाव... यम्मी... तोंडाला पाणी सुटलं असेल ना? वांद्रेमधील डॅनियल पॅटिसरी फ्रेंच केक शॉपमध्ये तुम्हाला डिजर्ट्सच्या वेगवेगळ्या व्हरायटी चाखता येतील. चॉकलेट्सपासून ते बिस्किटांपर्यंत सर्व इथं खवय्यांसाठी उपलब्ध आहे. हे डिजर्ट्स फक्त यम्मीच नाही तर रंगीबेरंगीही आहेत. मॉव, लाइम ग्रीन, अॅक्वा ब्ल्यू, पीच अशा अत्याधुनिक रंगाच्या छटा या डिजर्ट्समध्ये पाहायला मिळतील. रासबेरी, बेल्जियम चॉकलेट, पॅशन फ्रुट आणि चेरी या फ्लेव्हर्सचा वापर या डिजर्ट्समध्ये करण्यात आलाय. डिजर्ट्स खायला जेवढे स्वादिष्ट तेवढीच आकर्षक याची पॅकिंग आहे.

मॅकारून्स, बिसकॉटीज, कपकेकची किंमत 75 रुपये आहे. तर 500 ग्रॅम क्लासिक लाँजेससाठी 200 आणि चॉकलेट लाँजेससाठी 350 रुपये तर चीज केकची किंमत अर्धा किलोसाठी 490 रुपये इतकी आहे. या फ्रेंच डिजर्ट्सची किंमत जास्त आहे. पण खाण्याचे शौकीन इथं नेहमी-नेहमी येण्याचा मोह टाळू शकणार नाहीत.  

Loading Comments