मुलूंडमध्ये झाला हळदी कुंकूचा समारंभ

Dalmia Estate
मुलूंडमध्ये झाला हळदी कुंकूचा समारंभ
मुलूंडमध्ये झाला हळदी कुंकूचा समारंभ
मुलूंडमध्ये झाला हळदी कुंकूचा समारंभ
मुलूंडमध्ये झाला हळदी कुंकूचा समारंभ
मुलूंडमध्ये झाला हळदी कुंकूचा समारंभ
See all
मुंबई  -  

मुलूंड - मुलूंडमध्ये म्हाडा कॉलनीमध्ये राजा गणेश मंडळातर्फे महिलांनी खास होम मिनिस्टरचा खेळ आयोजित करण्यात आला होता. 12 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवानिमित्त तेथील स्थानिक महिलांनी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व महिलांनी अगदी साज शृंगारासह उपस्थिती दर्शवली होती. मराठमोळ्या पारंपरिक वेशात मराठमोळे समारंभ साजरे करण्यात सर्वच महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.हेरंब संगीत कला अकॅडमी मधील सौ सविता हांडे या खेळाचे सूत्र संचालन करत होत्या. अंताक्षरी तसेच ग्लासांचे मनोरे रचणे आणि स्ट्रॉ एकात एक अडकवून त्याची लांब रेष आखणे अशा अनेक खेळांनी या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती. सर्व स्पर्धा पार केल्यावर म्हाडा कॉलनी मधीलच सौ. साक्षी सुर्वे यांना प्रथम विजेता म्हणून घोषित करण्यात आले. महिलांच्या रोजच्या कामाच्या व्यापात त्यांना अशा काही विरंगुळ्याची फार आवशक्यता असते. त्यामुळे या सर्व महिलांचा हा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल.

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.