Advertisement

harley davidson नं भारतातील गाशा गुंडाळला

लोकप्रिय अमेरिकन दूचाकी कंपनी हार्ले डेव्हिडसननं भारतातील आपली फॅक्ट्री बंद केली आहे.

harley davidson नं भारतातील गाशा गुंडाळला
SHARES

लोकप्रिय अमेरिकन दूचाकी कंपनी हार्ले डेव्हिडसननं भारतातील आपली फॅक्ट्री बंद केली आहे. बाईकच्या कमी विक्रीमुळे कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कंपनी लवकरच स्थानिक दूचाकीसोबतच्या भागीदारीची घोषणा करू शकते. ही कंपनी हिरो मोटरकॉर्प असण्याची शक्यता आहे.

क्रूझर बाइक बनवणारी अमेरिकन कंपनी हार्ले डेव्हिडसनची बाईक जेव्हा भारतात पहिल्यांदाच लाँच करण्यात आली, तेव्हा खूप उत्साह आणि अपेक्षा होत्या. मात्र अपेक्षेप्रमाणे ही बाईक भारतात जादू दाखवू शकली नाही. मात्र हळूहळू त्याची विक्री मंदावत गेली.

२०१८ साली ३ हजार ४१३ बाईक विकल्या गेल्या. २०१९ साली फक्त २ हजार ६७६ युनिट्सची विक्री झाली. तब्बल २२ टक्क्यांनी विक्री घटली. तर २०१९-२० या आर्थिक वर्षात २ हजार ५०० पेक्षाही कमी बाईक विकल्या गेल्या.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हार्ले डेव्हिडसन भारतातील आपला व्यवसाय कमी करत आहे. याशिवाय कोरोना व्हायरस महामारीमुळे व्यवसाय मंदावल्याने कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी केल्याचे सांगितले जाते. कंपनीची फॅक्ट्री हरियाणातील बावल येथे होती.

जगभरातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांची कपात, नवीन धोरणे हे सर्व नवीन सीईओ जोचेन झिट्झ यांच्या नवीन योजनेचा भाग असल्याचे सांगितले जाते. कंपनीने सांगितले की, ग्राहकांसाठी भारतातील आमची सेवा सुरूच राहील. तसेच नवीन वाहनांची देखील विक्री केली जाईल. आम्ही आमच्या बिझनेस मॉडेलमध्ये बदल करत असून, उत्पादन सुविधा बंद करत आहोत.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा