Advertisement

मुंबईतल्या 'या' ऑफिसमध्ये कुत्र्यांचा घरोबा


मुंबईतल्या 'या' ऑफिसमध्ये कुत्र्यांचा घरोबा
SHARES

तुम्ही एक छोटुसा क्युटसा पपी किंवा कुत्रा पाळला आहे. त्याची तुम्ही खूप खूप काळजी घेता. तो अगदी तुमच्या कुटुंबातील महत्त्वाचा भाग होतो. घरच्याच सदस्यासारखं तुम्ही त्याची काळजी घेता. त्याच्या खाण्यापासून ते आरोग्यापर्यंतच्या सर्व गोष्टीकडे तुम्ही स्वत: लक्ष देता. हे झालं घरात पाळलेल्या कुत्र्याबद्दल. पण रस्त्यावर राहणाऱ्या भटक्या कुत्र्यांची परिस्थिती याच्या अगदी उलट असते. त्याची कुणी एवढं काळजी घेणारं नसतं. पण आता या भटक्या कुत्र्यांना देखील आधार मिळाला आहे


कुत्र्यांसाठी हक्काचं घर

पहिल्यांदाच रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी शेल्टर म्हणजेच राहण्यासाठी घराची सोय करण्यात आली आहे. टाटा ग्रृपची ही संकल्पना असून मुंबईतल्या बॉम्बे हाऊस या त्यांच्या मुख्यालयात कुत्र्यांसाठी राहण्याची सोय केली आहे. टाटा ग्रुप मुख्यालयाच्या इमारतीचं गेल्या नऊ महिन्यांपासून नूतनीकरणाचं काम सुरू होतं. नुतनीकरणाचं काम पूर्ण होताच ९४ वर्षांचा वारसा असलेली ही इमारत २९ जुलैला खुली करण्यात आली.



आकर्षक इंटिरीयर

कुत्र्यांच्या शेल्टरसाठी इमारतीतच जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फक्त जागाच नाही तर त्यांच्या खाण्या-पिण्यापासून ते राहण्यापर्यंत सर्व प्रकारची काळजी इथं घेण्यात येते. जवळपासच्या परिसरातील कुत्रे तिकडे येतात

या घराचं इंटिरीयर खरच बघण्यासारखं आहे. त्यांनी घराला आतून पिवळा रंग दिला आहे. तर एका भिंतीवर तुम्हाला कुत्र्यांच्या चेहऱ्याचे चित्र पहायला मिळेल. यासंदर्भात सेव्ह अवर स्ट्रेज या सामाजिक संस्थेनं फेसबुक पेजवर माहिती दिली आहे.



हेही वाचा

मुंबईतल्या पेटिंग सेंटरमध्ये कुत्र्यांसोबत घालवा वेळ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा