तुम्ही रोज वापरत असलेले 'हे' प्रोडक्ट्स कधी काळी 'असे' दिसायचे!

पण आज ज्या यंत्रांचा, वस्तूंचा आपण वापर करतो, त्यांची सुरुवात कशी झाली असेल बरं? किंवा सुरुवातीला या यंत्रांची रचना कशी असेल? या वस्तूंचा पहिला लूक कसा असेल? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले असतील.

  • तुम्ही रोज वापरत असलेले 'हे' प्रोडक्ट्स कधी काळी 'असे' दिसायचे!
  • तुम्ही रोज वापरत असलेले 'हे' प्रोडक्ट्स कधी काळी 'असे' दिसायचे!
  • तुम्ही रोज वापरत असलेले 'हे' प्रोडक्ट्स कधी काळी 'असे' दिसायचे!
  • तुम्ही रोज वापरत असलेले 'हे' प्रोडक्ट्स कधी काळी 'असे' दिसायचे!
  • तुम्ही रोज वापरत असलेले 'हे' प्रोडक्ट्स कधी काळी 'असे' दिसायचे!
  • तुम्ही रोज वापरत असलेले 'हे' प्रोडक्ट्स कधी काळी 'असे' दिसायचे!
  • तुम्ही रोज वापरत असलेले 'हे' प्रोडक्ट्स कधी काळी 'असे' दिसायचे!
  • तुम्ही रोज वापरत असलेले 'हे' प्रोडक्ट्स कधी काळी 'असे' दिसायचे!
SHARE

अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मुलभूत गरजा आहेत. पण बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्या सर्वांचं राहणीमान पाहता आता मुलभूत गरजांमध्ये आणखी काही गोष्टी समाविष्ट झाल्या आहेत. टीव्ही, मोबाईल, एसी अशा यंत्रांना देखील आपल्या आयुष्यात मोलाचं स्थान आहे. सुरुवातीला ही यंत्रं नव्हती. पण डिजिटल जगतात शास्त्रज्ञांनी अनेक यंत्रांचा शोध लावला आणि बदलत्या काळानुसार त्यात अनेक बदल देखील केले. अर्थात यामागे त्या शास्त्रज्ञांची प्रचंड मेहनतही आहे.

पण आज ज्या यंत्रांचा आपण वापर करतो, त्यांची सुरुवात कशी झाली असेल बरं? किंवा सुरुवातीला या यंत्रांची रचना कशी असेल? या यंत्रांचा पहिला लूक कसा असेल? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले असतील. तुमच्या याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळणार आहेत.


अॅपलचा कम्प्युटर

'अॅपल' या ब्रँडबद्दल सर्वांनाच माहित आहे. अॅपलचा मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप खरेदी करणे हे सर्वांच्याच बकेट लिस्टमध्ये असेल. पण हा अॅपलचा पहिला कम्प्युटर कसा दिसत होता? हे तुम्ही पाहिलं आहे का? तुम्ही देखील हा फोटो पाहून अवाक व्हाल!


'अॅपल-आय' असं या कम्प्युटरचं नाव ठेवण्यात आलं होतं. आता आपण वापरत असलेला अॅपलचा कम्प्युटर आणि यात जमीन-आस्मानचा फरक आहे.


फोर्ड कार

जगातली पहिली मोटारकार जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यानं १८८५ साली फोर स्ट्रोक इंजिन वापरून बनवली. मॉडेल ए असं नाव कारला त्यावेळी देण्यात आलं.


पहिला सॅमसंग टीव्ही

टेलिव्हिजन बनवण्याच्या क्षेत्रात सॅमसंग हे नाव चांगलंच नावाजलेलं आहे. आज सॅमसंग टीव्हीच्या स्क्रीन मोबाईलच्या स्क्रीनपेक्षाही स्लिम आहेत. आपण याला डब्बा टीव्ही देखील बोलायचो. सॅमसंगच्या पहिल्या मॉडेलचं नाव P – 3202 असं होतं.कोलगेट

बाप्टिस्ट विल्यम्स कोलगेटने १८०६ मध्ये साबण आणि मेणबत्त्या बनवणारी एक छोटीशी फॅक्टरी सुरू केली. पण १८५७ मध्ये विल्यम्स जग सोडून गेला. त्याचा मुलगा सॅम्युअल कोलगेट याला साबण आणि मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायात रस नव्हता. पण दुसरे काही करण्यापेक्षा आपण यातच पुढे व्यवसाय करू, असा निर्णय घेऊन त्यानं कोलगेट कंपनी सुरू केली.


१८७३ सालापासून सॅम्युअलनं 'कोलगेट' बनवायला सुरुवात केली. काचेच्या बरण्यांमधून ही कोलगेट विकली जात असे. पण नंतर १८९६ पासून कोलगेटनं ट्यूब रूपातील कोलगेट बाजारात आणली. तेव्हापासून आजपर्यंत बहुतांश लोकांच्या घरात कोलगेट हा ब्रँड हमखास आढळतो.


कॅनन कॅमेरा

फोटो काढून घ्यायला आणि काढायला कुणाला नाही आवडत? प्रत्येकात एक फोटोग्राफर लपलेला आहेच. मध्यंतरी एक जोक चांगलाच व्हायरल होत होता. जर कॅमेऱ्यात ऑटो हा मोडच नसता, तर आज एवढे फोटोग्राफर्स तयारच झाले नसते.सुरुवातीला जेव्हा कॅमेऱ्यांची निर्मिती झाली, तेव्हा त्यात ऑटो मोड नव्हता. कालांतरानं कॅमेऱ्याच्या लुकसोबतच त्यात अनेक बदल करण्यात आले. पण सुरुवातीचा आणि आत्ताचा कॅमेरा तुम्ही पाहिला तर अवाकच व्हाल! त्यावेळी या कॅमेऱ्याचे नाव 'Kwanon' असे होते.


हार्ले डेव्हिडसन

हार्ले डेव्हिडसन कंपनीची बाईक खरेदी करण्याची इच्छा बहुतेक तरूण-तरूणींची आहे. जबरदस्त लुक आणि फीचर्स असणारी ही बाईक सुरुवातीला कशी दिसायची?बाईक नाही तर सायकल असल्यासारखं वाटतंय. सायकलसारखे टायर पण या सायकलला बाईकसारखं इंजिन लावलं आहे. आजच्या घडीला सर्वात महाग असणाऱ्या अशा या बाईकचं त्यावेळचं रूप पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल.


पहिला एचपी लॅपटॉप

एचपीचे कम्प्युटर आणि लॅपटॉप जगात प्रसिद्ध आहेत. एचपीनं कम्प्युटर विश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. एचपीचा लॅपटॉप सुरुवातीला एखाद्या टाईप रायटरसारखा दिसत होता. एचपीच्या पहिल्या लॅपटॉपचं नाव 'HP – 110' होतं.)  कंडोम

आज कंडोम वेगवेगळ्या प्रकारात आणि फ्लेवर्समध्ये बाजारात उपलब्ध आहे. पण १६४० साली तयार करण्यात येणारा कंडोम काहीसा असा दिसत होता. त्यावेळी कंडोम मेंढीच्या, डुकराच्या कातडीपासून बनवले जायचे. पण आता यामध्ये बरीच क्रांती झाली आहे.फोटो सौजन्य


हेही वाचा

कुरकुरीत आणि चटपटीत चिप्सचा जनक माहीत आहे का?


संबंधित विषय
ताज्या बातम्या