Advertisement

कांदा रडवतोय? मग या टिप्स अंमलात आणा!


कांदा रडवतोय? मग या टिप्स अंमलात आणा!
SHARES

भल्या भल्यांना या कांद्यानं रडवलं आहे. तुम्ही मनानं कितीही कठोर असाल. पण कांदा तुम्हाला रडवून सोडेल. तुम्ही कांदा चिरत असाल तर किंवा कुणी दुसरं कांदा चिरत असेल तर लगेच आपल्या गंगा-जमुना वाहायला लागतात. पण नेमकं डोळ्यांतून पाणी का येतं? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण यासोबतच तुम्ही हे जाणून घेण्यासाठी देखील उत्सुक असाल की, कांदा कापताना अश्रू येऊ नयेत यासाठी काय करावं? तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच तुमचे डोळे झोंबणार नाहीत.



 


कांदा चिरताना डोळे का झोंबतात?

कांद्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते. कांद्यात काही गंधकयुक्त संयुगे असतात. त्यासोबतच त्यात काही एन्झाइमदेखील असतात. पण जोवर कांदा एकसंध असतो, तोवर ही संयुगे आणि एन्झाइम परस्परांपासून अंतर ठेवून असतात. पण कांदा कापल्यानंतर या संयुगांचे रुपांतर अॅसिडमध्ये होते आणि एन्झाइमचे रूपांतर गंधकयुक्त ऑक्साईडमध्ये होते. हे रसायन हवेमार्फत डोळ्यात जाते. डोळ्यातील अश्रूंमधील पाण्याशी प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर सलफ्युरिक अॅसिडमध्ये होते. या अॅसिडमुळे डोळे चुरचुरतात. डोळे चुरचुरू लागले की डोळ्यातून आणखी अश्रू वाहू लागतात.



कांदा जमिनीत वाढतो. जमिनीतून कांदा आजूबाजूचं बरचसं गंधक शोषून घेतो. त्याचं रूपांतर सल्फोक्साईडमध्ये होतं. कांद्यामध्ये अमिनो अॅसिड, सल्फोक्सिक अॅसिड आणि एन्झाइम अॅसिड याच्यापासून सलफ्युरिक अॅसिड तयार होतं. त्यामुळे हे अॅसिड हवेत पसरतं. त्यामुळे डोळ्यातून पाणी येतं. कांद्यातील गंधकयुक्त संयुगेच कांद्याला विशिष्ट स्वाद देखील मिळवून देतात. त्यामध्ये असणाऱ्या हाय सल्फाइड या बाष्पनशील गंधकयुक्त रसायनामुळे त्याला तिखटपणा प्राप्त होतो.



कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते हे तर तुम्हाला आता कळले असेल. पण कांद्यामुळे डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी काय कराल, याच्या काही टिप्स...

1) कांदा कापण्यापूर्वी ३० मिनिटं फ्रिजमध्ये ठेवावा. त्यामुळे त्याचा चुरचुरीतपणा कमी होईल.

2) कांदा कापताना वरचा पापुद्रा काढून टाकावा. कांद्याचा वरचा भाग पहिला कापावा. सर्वात शेवटी पातीकडील भाग कापावा. या भागातच तुम्हाला रडवणारे घटक अधिक प्रमाणात असतात.



3) वाहत्या पाण्याखाली काळजीपूर्वक कांदा कापला तर डोळे चुरचुरणार नाहीत



4) जास्त धार असलेल्या चाकूनं कांदा कापा. असं केल्याने कांद्यात असणारे रसायन हवेत न पसरता एकजूट राहतात आणि डोळ्यातून पाणी येत नाही.  


5) कांदा कापल्यानंतर जर तो काही वेळानंतर वापरायचा असेल तर त्याला वाटीभर थंड पाण्यात टाकून ठेवा. जेणेकरून त्याचा वास आणि चव बिघडणार नाही.



6) कांद्याचे दोन तुकडे करून त्याचा पापुद्र काढून टाका. त्यानंतर कांदा थंड पाण्यात टाकून ठेवा. अर्धा तासानं तुम्ही कांदा कापायला घेऊ शकता.



7) कांदा कापताना पंखा बंद करा. त्यामुळे कांदा कापताना तुमच्या डोळ्यांना आणि इतरांना अधिक त्रास होणार नाही



8) कांदा कापताना दातांमध्ये ब्रेडचा तुकडा ठेवा. कांदा कापताना त्यातून निघणारे रसायन तुमच्या डोळ्यापर्यंत येत नाही. कारण ते रसायन ब्रेड शोषून घेते.





हेही वाचा

कचऱ्यातून सोसायटीनं टेरेसवर फुलवला मळा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा