कचऱ्यातून सोसायटीनं टेरेसवर फुलवला मळा!


  • कचऱ्यातून सोसायटीनं टेरेसवर फुलवला मळा!
  • कचऱ्यातून सोसायटीनं टेरेसवर फुलवला मळा!
  • कचऱ्यातून सोसायटीनं टेरेसवर फुलवला मळा!
  • कचऱ्यातून सोसायटीनं टेरेसवर फुलवला मळा!
  • कचऱ्यातून सोसायटीनं टेरेसवर फुलवला मळा!
  • कचऱ्यातून सोसायटीनं टेरेसवर फुलवला मळा!
SHARE

हिरवीगार मिरची, पालक, लाल टॉमेटो, काकडी, भेंडी, कढीपत्ता, मेथीलेमन ग्रास आणि बरचं काही... भाज्या आणि फुलझाडांचा हा मळा शेतात नव्हे, तर माहिममधल्या एका इमारतीच्या टेरेसवर फुलला आहे. इमारतीमधल्या सर्व रहिवाशांनी हा मळा स्वकष्टानं जोपासला आहे. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण रहिवाशांनी हा मळा किचन वेस्टपासून तयार केला आहे!माहिममधील मातोश्री पर्ल या २२ मजली इमारतीत ६५ फ्लॅट्स आहेत. या फ्लॅट्समधून दिवसाला जवळपास ३० किलो कचरा जमा करण्यात येतो. हा कचरा महापालिका डम्पिंग ग्राऊंडवर टाकणार आणि डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचा ढीग आणखी वाढत जाणार. त्यापेक्षा या कचऱ्याची योग्य विल्हेवाट इमारतीतच लावण्याची जबाबदारी रहिवाशांनी उचलली. त्यानुसार रहिवाशांनी इमारतीत २ खत तयार करण्याच्या मशिन उभारल्या. या मशिनच्या मदतीनं इमारतीतच चांगल्या प्रकारच्या खताची निर्मिती केली जाते. एका मशिनमध्ये जवळपास १० किलोपर्यंत खत तयार करता येतं.गेल्या २ वर्षांपासून इमारतीनं हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे जवळपास ६ हजार ३०० किलो ओला कचरा वाहून नेण्याचा पालिकेचा त्रास वाचला. याशिवाय ६ हजार ३०० किलो कचऱ्यापासून ८०० किलो खत रहिवाशांनी तयार केलं आहे. याच खताचा वापर करून जवळपास ४००० चौरस फूट टेरेसवर रहिवाशांनी सुंदर असा मळा फुलवला आहे. मिरची, पालक, टॉमेटो, काकडी, भेंडी, कढीपत्ता, मेथी, लेमन ग्रास असं बरंच काही या टेरेसवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे टेरेसवरच्या या मळ्याची जबाबदारी सोसायटीनं लहान मुलांवर सोपवली आहे.आमची एवढी मोठी सोसायटी नाही. त्यामुळे वेस्ट मॅनेजमेंटच्या नियमांमध्ये नाही बसत. तरीही आम्ही हा उपक्रम राबवतोय. निसर्गाला आमचं काही तरी देणं आहे, याच विचारानं आम्ही हा उपक्रम सुरू केला. पाणी आणि वायू प्रदूषण यामुळे मुंबईकर आधीच त्रस्त आहेत. आमच्या सोसायटीतील मुलांना याचा सामना करावा लागू नये आणि सोसायटीत चांगलं वातावरण रहावं, यासाठी आमचा हा प्रयत्न आहेअशी माहिती कमिटी सदस्य सतिश किनी यांनी हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राशी बोलताना दिलीसोसायटीमधून २ हजार २०० किलो सुखा कचरा देखील जमा केला जातो. या कचऱ्याचं 'आरयुआर' या संस्थेच्या मदतीनं रिसायकलिंग केलं जातं. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोसायटी आरयुआर या संस्थेच्या संपर्कात आली. आरयुआरनं सोसायटीत अनेक वर्कशॉप घेतली. त्यानंतर सोसायटीतर्फे सुक्या कचऱ्याची देखील विल्हेवाट लावण्यात आली.

निसर्गाच्या संवर्धनासाठी या सोसायटीनं उचललेलं पाऊल कौतुकास्पद आहे. मातोश्री पर्ल या सोसाटीचा आदर्श इतरांनी घेणं देखील आवश्यक आहेअसं आरयुआर ग्रीनलाईफच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मोनिशा नर्के यांनी म्हटलं आहेआरयुआरच्या मदतीनं सोसायटीत सुक्या कचऱ्याचं सात विभागात वर्गीकरण करण्यात आलं. यामध्ये कार्डबोर्ड, पेपर, प्लास्टिक बॉटल्स, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, मेटल ग्लास आणि टेट्रापॅक कार्टन्स यांचा समावेश आहे. हा सुका कचरा कचरा वेचणाऱ्यांना किंवा रिसायकल करणाऱ्यांना विकला जातो. त्यातून मिळणाऱ्या पैशातून सोसायटीत अनेक उपक्रम राबवले जातात.
हेही वाचा

टेट्रा पॅकचे 'कागदी' फर्निचर!


संबंधित विषय
ताज्या बातम्या