Advertisement

मुंबईचा वडापाव सातासमुद्रापार, मराठी तरूणानं परदेशींना लावली चटक

लंडनमध्ये वडापाव विकून मराठमोळ्या तरुणानं कोट्याधीश कमवले. आता आहेत ५ रेस्टॉरंट्सचे मालक. वाचा मुंबईच्या वडापावचा लंडनपर्यंतचा प्रवास

मुंबईचा वडापाव सातासमुद्रापार, मराठी तरूणानं परदेशींना लावली चटक
SHARES

वडा पावची चव आता अगदी सातसमुद्रापार म्हणजे अगदी लंडनमध्येही पोहोचली आहे. विशष म्हणजे एका मराठी तरुणानंच लंडनमध्ये हे हॉटेल सुरू केलं. ‘श्रीकृष्ण वडा पाव’ (SKVP) असं या हॉटेलचं नाव. आता मराठी माणसाचं हॉटेल आहे म्हटल्यावर मराठी तडका असणारच.

या रेस्टॉरंटमध्ये तुम्हांला अस्सल मराठी पदार्थांची चव चाखायला मिळणार आहेच यात काही शंका नाही. पण त्यासोबच त्यात सगळ्यात खास पदार्थ म्हणजे वडा पाव. या रेस्टॉरंटमध्ये फक्त एक पाऊंडमध्ये तुम्हांला वडा पावचा आस्वाद घेता येईल.


सुबोध जोशी आणि सुजय सोहनी यांनी १५ ऑगस्ट २०१० साली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे हॉटेल लंडनमध्ये सुरू केलं. गेल्या दहा वर्षात त्यांनी एक नाही तर ५ हॉटेल्स परदेशात सुरू केली. या हॉटेलमध्ये वडापाव विकून हे दोघं कोट्याधीश झाले. हळूहळू त्यांनी इतर भारतीय पदार्थ देखील आपल्या मेन्यूमध्ये समाविष्ट्य केले. 

वडापावसोबत इतर भारतीय मराठमोळे पदार्थ म्हणजेच पुरणपोळी, गुळ पोळी, मोदक, लाडू, चिवडा, चकली, गाजराचा हलवा असे बरेचत प्रकार आमच्याकडे आहेत. खास चाट म्हणजे झणझणीत तिखट अशी पाणीपुरी देखील मिळेल. या रेस्टोरंटमुळे लंडनमधील खवय्यांची भारतीय पदार्थ चाखण्याची गैरसोय दूर झाली आहेच पण परदेशी खवय्येही ही या रेस्टॉरंचला पसंती देत आहेत.

सुजय सोहनी

पण फक्त वडा पावच नव्हे तर बटर वडा पाव, शेजवान वडा पाव अशा वेगवेगळ्या चवीतही वडा पाव उपलब्ध आहे. वडा पावसोबतच अनेक भारतीय पदार्थ इथं तुम्हांला मिळू शकतात. मेनू कार्डवर नजर टाकल्यास तुम्हाला दिसूनही येईल की, परदेशी पदार्थांना इथं कुठंही स्थान देण्यात आलेलं नाही.

ठाण्यात जन्मलेला संजय हा लंडनमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मॅनेजर पदावर होता. पण मंदीच्या लाटेत नोकरी गमावल्यानंतर त्यानं ‘सुबोध जोशी’ या त्याच्या मित्राचं घर गाठलं. 

संजय आणि सुबोध हे एकत्र रिजवी कॉलेजमध्ये शिकलेले होते. शिक्षण झाल्यानंतर दोघांना लंडनमध्ये आयटी कंपनीत नोकरीची संधी मिळाली. काही वर्ष सगळं चांगलं चाललं. पण अचानक मंदीमध्ये संजय सोहनीची नोकरी गेली. नोकरी गमावल्यानंतर त्यानं सुबोध जोशी या त्याच्या मित्राचं घर गाठलं. 

बोलण्याच्या ओघात संजय बोलून गेला की ‘माझ्याकडे वडापाव खायला देखील पैसे नाहीत.’ या सहज निघालेल्या वाक्यातली वडापाव हीच त्यांची आयडिया बनली आणि त्यांनी चक्क लंडनमध्ये वडापाव विकायला सुरुवात केला.


डोक्यातील आयडिया प्रत्यक्षात उतरवताना त्यांना पहिली अडचण आली ती म्हणजे जागेची. शोधाशोध केल्यानंतर त्यांना एका ‘पोलीश आईस्क्रीम कॅफे’ मध्ये एक जागा मिळाली. हा कॅफे तोट्यात असल्याकारणानं कॅफे मालकानं त्यांना ४०० (रु. ३५ हजार ) पाउंड प्रती महिना दरानं जागा भाड्यानं दिली.

वडापाव १ पाउंड (रु. ८०) आणि दाबेली १.५० पाउंड (रु. १३१) या किमतीनं त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. पण ग्राहकांना आकर्षित कसं करायचं हा मोठा प्रश्न त्यांना पडला होता. यासाठी त्यांनी जाहीरात करण्याचं ठरवलं. पण त्यासाठी जास्त पैसा लागणार होता. म्हणून त्यांनी एक संकल्पना राबवली.

आम्ही एक योजना आखली. माझी नोकरी नसल्यानं मी सकाळपासून इथं असेन. सुबोध त्याच्या शिफ्टनंतर संध्याकाळी ४ नंतर येईल. आम्ही सात बाय सातच्या स्वयंपाकघरातून वडा पाव आणि चहा बनवायला सुरुवात केली. आता समस्या होती वडा पाव आणि चहा कसा विकायचा? पण त्यावरही आम्ही तोडगा काढला.

सुजय सोहनी, मालक, SKVP

दोघांनी लंडनच्या रस्त्यावर मोफत वडापाव वाटण्यास सुरुवात केली. यातून त्यांची जाहीरात झालीच. ‘इंडियन बर्गर, स्वस्त आणि मस्त’ म्हणत हा देसी वडापाव लंडनवासीयांनी स्वीकारलाच.

दोघांचा मार्केटिंग फंडा कामी आला, पण आता गरज होती मोठ्या जागेची. त्याच वेळी एका पंजाबी हॉटेलनं त्यांना सोबत व्यवसाय करण्याची ऑफर दिली. दोघांनी त्याला लगेच होकार कळवला आणि अशा प्रकारे एका लहानशा स्टॉलवर सुरू झालेल्या धंद्याचं रुपांतर ४.४० कोटी वार्षिक उत्पन्न असलेला व्यवसायात झालं.

अल्पावधीतच खवय्यांनी या स्नॅक्स बारला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. त्यांना मिळालेल्या या पाठिंब्याचा जोरावर त्यांनी लंडनमधील हॅरो शहरातही दुसरं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. कोरोना काळातही त्यांचं रेस्टॉरंट सुरू आहे.

सर्व सामान्यांसोबतच इथं सेलिब्रिटी, राजकीय नेते देखील भेट देत असतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या रेस्टॉरंट्सना भेट दिली आहे. यासोबतच अनेक बॉलिवूड आणि मराठी कलाकार इथला वडापाव चाखायला येतात. 

असे अनेक देश आहेत जिथं भारतीयांना अजूनही त्यांचे आवडते पदार्थ मिळत नाही. त्या देशांमध्ये देखील संजय आणि सुजोय  SKVP रेस्टॉरंट्स सुरू करणार आहेत. आता SKVP ब्रँड आंतरराष्ट्रीय स्थरावर नेण्यासाठी ते दोघं काम करत आहेत. यात त्यांना त्यांच्या पत्नी आणि काही जुने ऑफिस कलिग साथ देत आहेत. 

आम्हाला आशा आहे की हे दोघे असेच भारतीय पदार्थ वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचवतील... त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मुंबई लाईव्हकडून शुभेच्छा... 

वेबसाईट : http://www.shreekrishnavadapav.com/ हेही वाचा

World Vada Pav Day : वडापावला फ्यजुन तडका, ट्राय करा वडापावचे 'हे' ७ हटके प्रकार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा