Advertisement

Independence Day 2020 : भारताचा अभिमान असलेल्या तिरंग्याबद्दल जाणून घ्या १० गोष्टी

७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जाणून घ्या तिरंग्याबद्दलच्या या १० रंजक गोष्टी...

Independence Day 2020 : भारताचा अभिमान असलेल्या तिरंग्याबद्दल जाणून घ्या १० गोष्टी
SHARES

ध्वजारोहण करून देशभरात ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक भारतियाची शान, मान आणि अभिमान म्हणजे तिरंगा. भारताच्या तिरंग्याबद्दल बऱ्याच गोष्टी अनेकांना माहित नाही. तिरंग्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 • भारताचा पहिला राष्ट्रध्वज १९०४ साली स्वामी विवेकानंद यांनी तयार केला. त्यावेळी त्यात केवळ दोनच रंग होते ते म्हणजे लाल आणि पिवळा. लाल रंग लढ्याचे आणि पिवळा विजयाचे प्रतिक मानला जात होता. त्यावर इंद्राचं वज्राची प्रतिमा होती. त्यानंतर त्याला बऱ्याच जणांनी बदललं.
 • पेंगली वेंकय्या यांच्यावर भारतीय तिरंग्याची जबाबदारी दिली. तिरंगा बनवण्याआधी ते गांधीजींना भेटले. गांधीजींच्या म्हणण्यानुसार त्यामध्ये त्यांनी चरखा अंकित केला. लाल, हिरवा रंग आणि त्यावर चरख्याचं चित्र असा ध्वज तयार केला.
 • चरख्या एवजी त्यावर मधोमध अशोक चक्र असावं ही सूचना सुरैया तय्यबजी यांनी केली. त्यानुसार तिरंगा निश्चित करण्यात आला.
 • २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संसदेमध्ये तीन रंगाच्या निशाणाला भारतीय तिंरगा म्हणून मान्यता देण्यात आली.
 • भारतीय तिंरगा फक्त खादी कपड्यांपासूनच बनवता येतो. इतर कोणत्याही कपड्यांपासून बनवला गेला तर कायदेशीर गुन्हा मानला जातो.
 • तिरंगा बनवण्याची परवानगी केवळ एकाच संस्थेला देण्यात आली आहे. कर्नाटका खादी ग्रामद्योग संयुक्त संघ हीच संस्था केवळ तिरंगा बनवू शकते.
 • २००२ सालापर्यंत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच तिरंगा फडकावला जाण्याची परवानगी होती. इतर दिवशी फडकवला तर तो गुन्हा मानला जायचा. पण २००१ साली नवीन जिंदल यांनी या विरोधात याचिका दाखल केली. त्यांच म्हणणं होतं की झेंडा म्हणजे राष्ट्रीयत्वाचे प्रतिक आहे. त्यामुळे झेंडा कधीही फडकवला तर तो गुन्हा ठरू नये.
 • न्यायालयानं २००४ साली जिंदल यांच्या निर्णयाला मान्यता दिली.
 • भारताच्या सीमेमध्ये जर तिरंगा अन्य कोणत्याही देशाच्या झेंड्यासोबत फडकवायचा असेल तर भारतीय तिरंगा सर्वांच्या पुढे असायला हवा.
 • जर तिरंगा एखाद्या छतावर फडकवायचा असेल तर तो नेहमी उजव्या बाजूनं फडकवला जातो.
 • १९७१ साली अंतराळात गेलेल्या राकेश शर्मानं भारतीय तिरंगा देखील सोबत नेला होता.  
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा