'इथं' भरते कुत्र्या-मांजरांची जत्रा

जुहूतल्या जेव्हिपिडी ग्राऊंडमध्ये 'पेट फेड २०२०'चं आयोजन करण्यात आलं होतं. इथं वेगवेगळ्या प्रजातीचे कुत्रे आणि मांजरी पाहायला मिळाल्या.

SHARE

पाळीव प्राणी कुणाला नाही आवडत. प्रत्येक जण पाळीव प्राणी पाळत नसलं तरी एखादा कुत्रा किंवा मांजर रस्त्यात दिसलं की आपण त्यांना गोंजारतोच. अशाच प्राणीमित्रांसाठी जुहूतल्या जेव्हिपिडी ग्राऊंडमध्ये 'पेट फेड २०२०'चं आयोजन करण्यात आलं होतं. इथं वेगवेगळ्या प्रजातीचे कुत्रे आणि मांजरी पाहायला मिळाल्या


दोन दिवसांची जत्रा

११ आणि १२ जानेवारीला भारतातील सर्वात मोठा पेट फेड महोत्सव पार पडला. हा पेट फेड म्हणजे कुत्र्या-मांजरांची जत्राच. थोडे थोडके नाही तर चक्क ३००० च्या जवळपास कुत्रे आणि मांजरी इथं पाहायला मिळाल्या. पेट फेड हा महोत्सव तीन एकराच्या भव्य जागेत या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं भारतीय सैन्य दलाच्या सहाय्यानं पोलिस डॉग शो, तसंच वर्ल्ड कॅट फेडरेशनच्या सहाय्यानं आंतरराष्ट्रीय कॅट शो, फॅशन शो असे प्राण्यांसाठी अनेक गेम्आस आयोजित केले होते.


#AdoptDontShop

देशभरातील पेट केअर क्षेत्रांतून तसेच आंतरराष्ट्रीय पातळीचे वितरकसुद्धा या महोत्सवामध्ये सहभागी झाले होते. यात कुत्रा आणि मांजरी संदर्भातील ४०० हून अधिक उत्पादनं ग्राहकांना बघायला मिळाली. हा महोत्सव ज्यांच्याकडे पाळीव प्राणी नाहीत त्यांच्यासाठीही खुला होता. #AdoptDontShop या टॅग लाईन खाली प्राणीमित्रांना प्रोत्साहित केलं गेलं. जर तुम्ही प्राणी दत्तक घेतलेत तर त्यांना घर मिळेल. त्यांची चांगली देखभाल होईल, अशाप्रकारे प्राण्यांसाठी प्रचार केला गेला


संबंधित विषय
ताज्या बातम्या