स्नॅपचॅटला दाखवला भारतीयांनी इंगा


SHARE

भारतात दिवसागणिक नेट युजर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोणत्याही अॅप आणि इलेकट्रॉनिक उपकरणांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. फेसबुकपासून ते गुगलपर्यंत जिथे भारतीयांसाठी एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहिलं जात तिथेच स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पिगलन याने भारत खूप गरीब देश आहे आणि आमचं अॅप केवळ श्रीमंत देशांसाठी बनवण्यात आलं आहे, असं वक्तव्य करून भारतीय नागरिकांची नाराजी ओढून घेतली आहे. 

याच्याच निषेधार्थ अनेक भारतीय अँड्रॉइडधारकांनी आपल्या मोबाइलमधून स्नॅपचॅट डिलिट करत स्नॅपचॅट सीईओला खडेबोल सुनावले आहेत. त्या सोबतच भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून #BycottSnapchat आणि #UninstallSnapchat हॅश टॅग करून आपली नाराजी वक्त करण्यात येत आहे. यामुळे स्नॅपचॅटच्या रेटिंगमध्ये मोठी घट होत चालली आहे. स्नॅपचॅटच्या सीईओच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर देखील नेटिझन्सनी आपला विरोध दर्शवत स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पिगलन यांची खिल्ली उडवणारे अनेक मेसेज सध्या व्हायरल केले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या