Advertisement

आदिरंग महोत्सवाला सुरुवात


आदिरंग महोत्सवाला सुरुवात
SHARES

प्रभादेवी - राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या वतीनं भारतीय आदिवासी लोककलेवर आधारित भव्य महोत्सव आदिरंग मुंबईत सुरू झाला. पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, येथे 31 डिसेंबरपर्यंत तो चालेल.
या महोत्सवाचं उद्घाटन 29 डिसेंबरला सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते संध्याकाळी झालं. या सोहळ्याला वामन केंद्रे, मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. संजय देशमुख, अभिनेता यशपाल शर्मा, अर्जुन देवचरण उपस्थित होते. या वेळी विनोद तावडे म्हणाले की, कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मुंबईत महाराष्ट्र इंटरनॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सुरू करण्यात येणार आहे. या तीन दिवसीय महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा