आयजी इंटरनॅशनलची बेलओर्टा फळ कंपनीशी भागीदारी

 BDD Chawl
आयजी इंटरनॅशनलची बेलओर्टा फळ कंपनीशी भागीदारी

वरळी - परदेशी फळं आयात करणाऱ्या आयजी इंटरनॅशनल या भारतीय कंपनीनं बेल्जियमच्या बेलओर्टा फळ कंपनीशी मंगळवारी वरळी येथील फोर सीजन हॉटेलमध्ये भागीदारी केली. अभिनेता सोनू सूद आणि सुप्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांच्या हस्ते भारतात दाखल करण्यात आलेल्या पेअर्स या फळाच या वेळी लाँचिंग करण्यात आलं. या वेळी आयजी इंटरनॅशनल कंपनीचे संचालक तरुण अरोरा, बेलओर्टा कंपनीचे व्यवस्थापक जो लॅब्रेख्त आदीही उपस्थित होते. बेल्जियम कॉन्फरन्स पेअर्स बी नसलेलं फळ आहे. ते कच्चं-पक्कं कसंही खाता येतात. विशेष म्हणजे हे फळ लवकर खराब होत नाही. पेअर अतिशय रसाळ असल्याने तहान भागवण्याकरताही उत्तम पर्याय म्हणूनही ते कामी येतं. सध्या हे फळ रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.

Loading Comments