कोळी महोत्सव खवय्यांसाठी पर्वणी

वरळी - जवळा, कोलंबी रस्सा, फ्राय कोलंबी, कोलंबी बिर्यानी, पापलेट रस्सा आणि फ्राय, सुरमई खिमा, खेकडा, चिकनचे एक ना अनेक प्रकार आणि सोबतीला ज्वारी, तांदळाची भाकरी आणि वडे. तेही कोळी स्टाइल. आहा. जबरदस्त. तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. ही सगळी मेजवानी होती वरळी सी फेसवर झालेल्या तीन दिवसांच्या कोळी महोत्सवात. युवासेनेचे उपविभागीय अधिकारी अभिजीत पाटील यांनी या कोळी खाद्य महोत्सवाचं आयोजन केलं होतं.

अनेक महिला बचत गटांनी कोळी महोत्सवात स्टॉल लावले होते. खवय्यांसाठी तर हा कोळी महोत्सव पर्वणीच ठरला. कोळी समाजाची बोलीभाषा, नृत्य, खाद्यसंस्कृती कोळीवाड्यांच्या चौकटीतून बाहेर काढून मुंबईकरांसमोर आणण्यासाठी या कोळी महोत्सवाचं आयोजन होतं. मुंबईकरांनी या खाद्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला.

Loading Comments