Advertisement

बाबासाहेबांबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?


बाबासाहेबांबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल ही जयंती. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार. दलितांच्या हक्कांसाठी ते शेवटपर्यंत लढले. फक्त दलितच नाही प्रत्येक शोषित समाजाला बाबासाहेबांनी स्वाभिमानाने आणि स्वत:च्या हक्कांसाठी लढायला शिकवले. संवैधानिक, सामाजिक स्वतंत्रता मिळवून देण्यात आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. उपेक्षा, हाल सहन करत त्यांनी शिकण्याचा ध्यास घेतला. इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, धर्म, कायदा अशा अनेक विषयांवर त्यांचा अभ्यास होता. फक्त मराठीच नाही तर हिंदी, इंग्रजी, पर्शियन अशा अनेक भाषांवर त्यांची पकड होती. त्यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. पण त्या परिस्थितीतही त्यांनी समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली.


BharatRatna Dr. #BabasahebAmbedkar ,said "They can not make history, who forget history" Our humble tributes to #Babasaheb. #ambedkarjayanti pic.twitter.com/O7olZ4MAiW

— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) April 14, 2017
  • आंबेडकर यांचे खरे आडनाव आंबवडेकर होते. रत्नागिरीतील त्यांच्या मूळ गावाचे नाव आंबवडेकर होते. यावरूनच त्यांना आंबवडे हे आडनाव प्राप्त झाले. पण बाबासाहेबांचे शाळेतील शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांचे आडनाव शाळेच्या रेकॉर्डवर आंबेडकर असे ठेवले. तेव्हापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखले जाऊ लागले.
  • १९३५ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका होती. 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी' या बाबासाहेबांच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या संदर्भांमुळे आरबीआय स्थापन होण्यास मदत झाली
  • मोठं धरण बांधण्याचं तंत्रज्ञान भारतात आणण्यात आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका होती. दामोदर, हिरकुड आणि सोने नदीबांध प्रकल्पांमध्येही त्यांची भूमिका होती.
  • नोव्हेंबर १९४२ मध्ये भारतीय कामगार परिषदेच्या ७ व्या सत्रात कामगारांसाठी त्यांनी कामाचे तास १४ तासांहून 8 तास केले
  • १९५५ साली परत आंबेडकरांनी मध्यप्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांचे चांगल्या प्रशासनासाठी विभाजन सुचवले होते. 45 वर्षांनंतर छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांची स्थापना झाली.
  • आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या कलम ३७०ला विरोध केला होता. या कलमामुळे जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळाला होता
  • आंबेडकरांचे आत्मचरित्र 'वेटिंग फॉर अ व्हिसा' १९३५-३६ दरम्यान त्यांनी लिहिले असून ते कोलंबिया विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जाते.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा