लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये झगमगाट !

लोखंडवाला कॉम्प्लेक्स - दिवाळीनिमित्त दरवर्षी इथे होणारी विद्युत रोषणाई आसपासच्या परिसरात चर्चेचा विषय असते. यंदाही हा सर्व परिसर हजारो विद्युत दिव्यांनी उजळला आहे. या रोषणाईचा खर्च इथल्या व्यापा-यांनी केलाय. गेल्या 15 वर्षांपासून लोखंडवालामध्ये अशा प्रकारे रोषणाई केली जाते.

जातीपातीचा किंवा धर्माभेदाचा कोणताही अडसर येऊ न देता ऐक्याचा अनोखा आदर्श इथे पहायला मिळतो. त्यामुळे सणांचा मूळ उद्देशच इथे ख-या अर्थानं सार्थ ठरतो असं म्हणायला हरकत नाही.

Loading Comments