प्रभादेवीत माणदेशी महोत्सव

Ravindra Natya Mandir, Mumbai  -  

प्रभादेवी - म्हसवडच्या माणदेशी फाउंडेशननं महिलांसाठी स्पेशल महोत्सवाचं आयोजन केलंय. सातारा जिल्ह्यातला दुष्काळी भाग असलेल्या या भागातल्या महिलांनी पुढाकार घेत हा महोत्सव आयोजित केलाय. ग्रामीण भागातल्या महिला उद्योजकांना मुंबईसारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी हा महोत्सव आहे.

प्रभादेवीतल्या रवींद्र नाट्यमंदिराच्या आवारात 5 ते 8 जानेवारी दरम्यान हा महोत्सव सुरू आहे. सातारा जिल्ह्यात 2012 मध्ये हा महोत्सव सुरू करण्यात आला. माणसारख्या दुष्काळी भागात रोजगार निर्मिती हे मोठं आव्हानाचं. त्यामुळे या महिला एकत्र आल्या आणि त्यातूनच जन्म झाला माणदेशी फाउंडेशनचा.

वीस वर्षांत फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे तीन लाख महिलांना पाठबळ मिळालंय. दुष्काळी भागातल्या महिलांसाठी काम करणाऱ्या या संस्थेला शक्ती देण्याची मुंबईकरांनाही ही चांगली संधी आहे.

Loading Comments