राज्यातले सण देखाव्याच्या माध्यमातून

 Dadar
राज्यातले सण देखाव्याच्या माध्यमातून
राज्यातले सण देखाव्याच्या माध्यमातून
राज्यातले सण देखाव्याच्या माध्यमातून
राज्यातले सण देखाव्याच्या माध्यमातून
See all
Dadar , Mumbai  -  

माहिमच्या श्री गणेशोत्सव मंडळाने यावर्षी मराठी सणांना अनुसरून देखावा साकारला आहे. यामध्ये महाराष्ट्रात साजरे होणारे सर्व सण दाखवण्यात आले आहेत. यंदा डिझायनर रितेश जाधव यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे. मागच्या वर्षी या मंडळाने किल्ला साकारला होता. 1980साली स्थापन केलेल्या या मंडळाचे यंदा 38वे वर्ष आहे. दरवर्षी बाप्पांची मूर्ती पेणवरून आणली जाते. या वर्षी 6 फुटांची मूर्ती बसवण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी मंडळातर्फे वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. 

Loading Comments