• शिल्पकलेतून उलगडले आई-बाळाच्या नात्याचे पदर
SHARE

फोर्ट - आई आणि बाळाचे नाते हे अतूट असते. खरंतर ती भावना शब्दात मांडणे कठीणच पण. हे क्षण शिल्पकार विक्रांत मांजरेकर यांनी आपल्या शिल्पातून मांडले आहेत. 24 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ही कलाकृती ब्राँझ आणि मार्बलमध्ये तयार केली आहे. ही शिल्पकृती तयार करायला 2 महिन्यांचा कालावधी लागला आहे. स्त्रीच्या उदरात होणारी बाळाची वाढ, बाळाला दुध पाजणारी आई, बाळाला गोंजारणारी आई... स्त्रीला मातृत्वाची चाहूल लागल्यापासून ते बाळाचे संगोपन होईपर्यंतचे विविध पैलू या शिल्पकृतीतून पाहायला मिळतात. जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबईतील व्यवसायिक आणि झेन लाईव्ह मीडियाचे संचालक मिलिंद सबनीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘मुंबई लाइव्ह’चे कार्यकारी संपादक स्वप्नील सावरकर आणि कन्सल्टिंग आर्ट डिरेक्टर प्रदीप म्हापसेकरदेखील उपस्थित होते. मानवी भावनांचे बंध हुबेहुब उभं करणारं हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी नक्कीच पर्वणी ठरेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या