Advertisement

जागतिक मराठी संमेलनाचं दादरमध्ये उद् घाटन


जागतिक मराठी संमेलनाचं दादरमध्ये उद् घाटन
SHARES

दादर - शोध मराठी मनाचा हे 14 वं जागतिक मराठी संमेलन 7 जानेवारीपासून दरम्यान दादरच्या शिवाजी मंदिरात सुरू झालं. या संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. या वेळी शरद पवार यांच्या हस्ते जयंत सावरकर आणि सचिन पिळगावकर यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या प्रसंगी शरद पवार म्हणाले की, कलाक्षेत्रातल्या दिग्गजांना गौरवताना मला मनापासून आनंद वाटत आहे.

या कार्यक्रमात वायगाव ते वॉशिंग्टन असा व्यावसायिक प्रवास करणारे अविनाश राजमाने यांनीही उपस्थितांना व्यवसाय कसा करायला हवा, याबाबत मार्गदर्शन केलं. 'मराठी माणसं व्यवसायात पडत नाहीत, असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला मी सांगतो की, जगभरात मराठी माणसांचे व्यवसाय आहेत,' असं त्यांनी अभिमानानं नमूद केलं. 

या संमेलनाचं आयोजन जागतिक मराठी अकादमी आणि छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. रविवार, 8 जानेवारी रोजी या संमेलनाची सांगता होईल.

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा