अबब... 18 मजली क्रूझ मुंबईत

 Pali Hill
अबब... 18 मजली क्रूझ मुंबईत
अबब... 18 मजली क्रूझ मुंबईत
See all

मुंबई - जर्मनीवरून १८ मजले असलेली आंतरराष्ट्रीय क्रूझ बोट शनिवारी पहाटे मुंबईत दाखल झालीय. मुंबईच्या समुद्रात प्रथमच अशा प्रकारची क्रूझ बोट दाखल झालीय.

‘गेंटिंग ड्रीम’ असं या क्रूझचं नाव आहे. या सप्ततारांकित क्रूझची एकूण प्रवासी क्षमता चार हजार आहे. यामधून दोन हजार प्रवासी शनिवारी संध्याकाळी सात वाजता रवाना होतील. प्रवाशांना घेऊन ही क्रूझ प्रथम कोलंबोला मग सिंगापूरला जाणाराय. मुंबईकरांसह देशभरातून आलेल्या प्रवाशांचा यात समावेश आहे. ‘ग्रीन गेट’ इथं या क्रूझचं स्वागत मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे करण्यात आलं. सकाळी झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली.

Loading Comments