इडलीचे फ्लेवर अनेक

  मुंबई  -  

  किंग्ज सर्कल - इटली आपल्यापैकी बहुतेकांच्या नाश्त्यातील आवडता पदार्थ. पण इडलींचे वेगवेगळे अनेक प्रकार असू शकतात याची तुम्हाला कल्पनाही नसेल. अशा बहुविध प्रकारच्या इडलीची चव चाखायची असेल तर तुम्हाला 'इडली हाउस' गाठावे लागेल.

  महेश्वरी उद्यान, किंग्ज सर्कल येथे असलेले 'इडली हाउस' तिथे मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इटलींसाठी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचे हे एकमेव हॉटेल असल्याने फक्त इडली खाण्यासाठी लोकांची येथे गर्दी होते.
  कोटू, कांचीपुरम इडली, सेवाई, मुधो, काकडी तसेच व्हेजिटेबल इडली असे एक ना अनेक इडलींचे प्रकार येथे पाहावयास मिळतात. त्याचप्रमाणे इडली सोबत खाल्ले जाणारे मसाले हे 'मोलगा पुडी' 'लिंबडा पुडी' हे देखील येथील खास वैशिष्ट्य. खोबरे व तीळ या तेलामध्ये मिक्स करून हे मसाले इडली सोबत खाल्ले जातात.या सगळ्यांमध्ये पानपोळी या इडली प्रकाराला इथे जास्त मागणी आहे.
  असे आगळे वेगळे प्रकार या इडली हाउस मध्ये मिळतात. हे मसाले पारंपरिक पद्धतीचे असल्याने एक वेगळीच चव याला असते. "केळी, केवडा, फणस यांच्या पानामध्ये गुंडाळून हे इडलीचे प्रकार बनवले जातात. या पानांमध्ये मानवी शरीराला योग्य असे जीवनसत्व असल्याने आम्ही या पानातूनच व चवीसाठी याचा वापर करतो," असे हॉटेल मालक 'सतीश रामा नायक' यांनी सांगितले. इटली हाऊसचे अॅपदेखील आहे. त्यामुळे आवडीची इटली घरीदेखील मागवण्याची सोय झाली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.